Hardik Shubheccha Marathi Movie PR
मनोरंजन बातम्या

Hardik Shubheccha: 'हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय'; वैवाहिक नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Hardik Shubheccha Marathi Movie: अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोगचा नवा चित्रपट 'हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

Shruti Vilas Kadam

Hardik Shubheccha: मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून यात एका नवविवाहित दाम्पत्य पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना नातेसंबंधातील एका महत्वाच्या पैलूशी जोडून ठेवेल. “हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?” या चित्रपटात वैवाहिक जीवनातील लैंगिक सुसंगतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. हा चित्रपट २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण दुबईसह ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये झाले असून खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिस मध्ये चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.

दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, “आजच्या आधुनिक काळातही लैंगिक सुसंगतता हा विषय अनेकदा दुर्लक्षित केला जातो. नातेसंबंधांना फक्त भावनिक किंवा मानसिक बळ पुरेसं नसतं, तर शारीरिक सुसंगतता देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही हा विषय एका सहज पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.”

आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपट येत्या २१ मार्च २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले असून आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे. पॅनोरमा स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची धुरा सांभाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT