Grammy Awards 2025: ग्रॅमी जिंकणाऱ्या 'या' भारतीय संगीतकार कोण; पेप्सिकोच्या माजी सीईओशी काय आहे खास नाते?

Chandrika Tandon : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे झालेल्या ६७ व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये भारतीय संगीतकार चंद्रिका दीक्षित आणि तिच्या सहकारी संगीतकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Chandrika Tandon Grammy Award 2025
Chandrika Tandon Grammy Award 2025Google
Published On

Grammy Awards 2025: भारतीय-अमेरिकन संगीतकार आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांनी संगीतकार एरू मात्सुमोतो आणि वॉटर केलरमन यांच्यासोबत 'त्रिवेणी' नावाचा एक संगीत अल्बम तयार केला. या संगीत अल्बमला चँट श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी, २०११ मध्ये झालेल्या ५३ व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये, चंद्रिका टंडनला तिच्या 'ओम नमो नारायण' या गाण्याच्या अल्बमसाठी चँट श्रेणीत नामांकन मिळाले होते. मात्र, त्यावेळी तिला हा पुरस्कार जिंकता आला नाही. भारतातील चेन्नई येथील एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली चंद्रिका ही पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांची मोठी बहीण आहे.

चंद्रिका टंडनची आई स्वतः एक संगीतकार होती आणि तिचे वडील चेन्नईतील एका बँकेत काम करायचे. कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी असल्याने, चंद्रिकाचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षी निश्चित होणार होते. पण आजोबांकडून प्रेरणा घेऊन चंद्रिकाने पुढे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. चंद्रिकाची आई या निर्णयावर खूश नव्हती. पण दोन दिवसांच्या उपोषणानंतर, चंद्रिकाला अखेर तिच्या कुटुंबाने चेन्नईतील मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी दिली. चंद्रिकाचे आजोबा चेन्नईमध्ये न्यायाधीश होते, तिलाही तिच्या आजोबांसारखे न्यायाधीश व्हायचे होते, पण तिचे गुण पाहून तिच्या शिक्षिकांनी तिला आयआयएम सारख्या संस्थेतून व्यवसायाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. जेव्हा चंद्रिकाने आयआयएम अहमदाबादमध्ये व्यवसायाचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिच्या वर्गात फक्त ८ मुली होत्या. पदवीधर झाल्यानंतर चंद्रिकाला न्यू यॉर्कमध्ये नोकरी मिळाली आणि तेव्हापासून ती अमेरिकेत स्थायिक झाली.

Chandrika Tandon Grammy Award 2025
Sai Tamhankar : सई ताम्हणकर देणार मोठं सरप्राईझ; 'त्या' पोस्टमुळे वाढली उत्सुकता

चंद्रिका तिची संस्कृती विसरली नाही

व्यवसायाला आपले करिअर मानून पुढे गेलेल्या चंद्रिकाने तिच्या सासऱ्यांच्या ९० व्या वाढदिवशी 'ओम नमो नारायणा' या मंत्राचे एक जप संगीत तयार केले आणि तिने स्वतः स्टुडिओमध्ये जाऊन हे संगीत रेकॉर्ड केले होते. नंतर, या रेकॉर्डिंग्जचा वापर करून, त्यांनी 'सोल कॉल' नावाचा एक संपूर्ण संगीत अल्बम तयार केला आणि त्यांचा पहिला अल्बम २०११ मध्ये ५३ व्या ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकित झाला. तिच्या कारकिर्दीत, चंद्रिकाने लॅटिन आणि जाझ संगीताचा वापर करून 'सोल मार्च' नावाचा अल्बम देखील तयार केला आहे, हा संगीत अल्बम महात्मा गांधींच्या दांडी मार्चपासून प्रेरित आहे. ९ रागांनी बनलेला त्यांचा 'ओम नमः शिवाय' हा मंत्राचा अल्बमही लोकांना आवडला.

Chandrika Tandon Grammy Award 2025
Junaid Khan: 'मी आमिर खानचा मुलगा...'; जुनैद खानने उघडपणे सांगितले स्टार किड असण्याचे फायदे

तीन कलाकारांची 'त्रिवेणी'

चंद्रिकाला ज्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे, त्या 'त्रिवेणी'मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बासरीवादक वॉटर केलरमन आणि जपानी-अमेरिकन सेलिस्ट एरू मात्सुमोतो यांनीही चंद्रिकासोबत काम केले आहे. या संगीतात चंद्रिका दीक्षितने इंडियन पॉप, इंडियन इंडी, न्यूज एज आणि इंडियन लोकसंगीताचा समावेश केला आहे. चँट श्रेणीमध्ये, चंद्रिका रिकी केज, राधिका वेकरिया आणि अनुष्का शंकर सारख्या भारतीय कलाकारांशी स्पर्धा करत होती. पण सर्वांना मागे टाकून त्याने हा पुरस्कार जिंकला. ग्रॅमी पुरस्कारांच्या मंचावर सलवार सूट घालून हा सन्मान स्वीकारण्यासाठी आलेल्या चंद्रिकाने तिच्या पारंपारिक लूकने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com