Bigg Boss OTT 2 1st Eviction  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 1st Elimination : बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, 'या' स्पर्धकाला 12 तासांतच घरातून काढलं बाहेर

Puneet Superstar Evicted : पुनीत सुपरस्टारने बिग बॉसला धमकावले.

Pooja Dange

Puneet Superstar Evicted From Bigg Boss OTT 2: बिग बॉसचा ओटीटीचा दुसरा सुरू झाला आहे. शोमध्ये आलिया सिद्दीकी, पूजा भटसह अनेक स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. पुनीत सुपरस्टार (प्रकाश कुमार) नावाच्या एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा देखील शोमध्ये सहभागी झाला होता. जो आता शो मधून बाहेर देखील गेला आहे.

'बिग बॉस OTT 2' च्या पहिल्या एपिसोडमध्ये स्पर्धकांची एन्ट्री आणि पॅनलिस्ट विचारलेले प्रश्न दाखवण्यात आले. तर १३ स्पर्धकांपैकी ११ स्पर्धकांनी घरामध्ये प्रवेश केला. पहिल्या दिवशी सर्वांनी एकमेकांशी ओळख करून घेतली आणि एकमेकांची काळजी घेतली.

बफर टाईमनंतर लाइव्ह फीड सुरू होताच, बिग बॉस संतापले आणि सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी पुनीतला सुनावले. तर पुनीतने बिग बॉसला धमकी दिली, त्याला शोमधून काढून टाकले तरी त्याला फरक पडत नाही.

पुनीत सुपरस्टारच्या बाथरुमच्या कृत्यांवर बिग बॉसला राग आला. ग्रँड प्रीमियर पहिल्या एपिसोडच्या शेवटी, पुनित बाथरूममध्ये जातो आणि चेहऱ्यावर टूथपेस्टच्या दोन ट्यूब फसतो. हँडवॉशची भरलेली बाटली डोक्यावर ओतून घेतो. यानंतर त्याला चेहऱ्यावर पेस्ट लावण्याची सवय असल्याचे तो सांगतो.

घरातील बाकीचे लोक सकाळी कशाने दात घासतील याने त्याला काही फरक पडत नाही. अविनाश सचदेव आणि मनीषा राणी तिथे गेल्यावर पुनीत त्यानं अकथितरी उलट-सुलट सांगतो. बिग बॉसने चेहऱ्यावर टूथपेस्ट लावण्याचे आव्हान दिले होते, पुनीत असे खोटे सांगतो.

या घटनेनंतर, लाइव्ह फीडमध्ये, बिग बॉसने सर्व घरातील सदस्यांना लिव्हिंग रूममध्ये बोलावले आणि म्हणाले, "मला वाटले की मी शो चांगल्या आणि आनंदी मूडमध्ये सुरू करेन." पण घरात असं काही घडलं की त्यांना चांगलं वागायला जमणार नाही. ते म्हणाले की, घराचे काही नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. (Latest Entertainment News)

बिग बॉसनी इशारा दिला की, "घरातील सामानाचे नुकसान करणे, बिग बॉसच्या मालमत्तेचे नुकसान करणे ही मोठी चूक आहे." तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इजा होईल असे काहीही तुम्ही करू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ही तुमची पहिली आणि शेवटची चूक असावी. असे पुन्हा घडल्यास त्या सदस्याला घरातून बाहेर काढण्यात येईल.

पुनीतला बिग बॉसच्या धमकीचा फारसा फरक पडला नाही. त्याने बिग बॉसला म्हटले की, मला घरातून बाहेर काढायचे आहे खुशाल काढा. पुनीत उलट बिग बॉसला धमकावू लागला. पुनीत म्हणाला, "बिग बॉस तुला मला ठेवायचे आहे तर ठेव नसेल तर काढून टाक. मला नाही तर तुला टीआरपी मिळतोय.'' मनीषा राणी आणि फुकरा इन्सान यांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणाचे ऐकले नाही. (Celebrity)

पुनीत सुपरस्टारचे खरे नाव प्रकाश कुमार आहे. तो सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडिओ बनवतो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. तो इंस्टाग्राम आणि एमएक्स टाकटक सारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. तो सोशल मीडियावर त्याच्या काही पंच लाईन्ससाठी देखील प्रसिद्ध आहे, जसे की – कोठी बंगला वाले लॉग.

पुनीत कुमार हा मूळचा बिहारचा आहे. आधी टिकटॉक आणि नंतर इंस्टाग्रामवर लोकांनी त्याचे व्हिडिओ खूप लाइक केले. तो त्याच्या विचित्र व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT