Heart of Stone Trailer Released
Heart of Stone Trailer ReleasedSaam TV

Alia Bhatt Debut Movie Trailer Out: हिरोईन नव्हे व्हिलन.. पहिल्यांदाच खलनायिका झालेल्या आलियाचा रावडी अंदाज; हार्ट ऑफ स्टोनचा ट्रेलर प्रदर्शित

Heart of Stone Trailer Released: हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज.
Published on

Alia Bhatt Movie Heart of Stone Trailer Released : अभिनेत्री आलिया भटने हॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. तिने काम केलेल्या डेब्यू चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हार्ट ऑफ स्टोन असे या चित्रपटाचे नाव असून ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

गॅल गॅडोटच्या हार्ट ऑफ स्टोनच्या ट्रेलरमध्ये दमदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. हार्ट ऑफ स्टोनचा ट्रेलर पाहिल्यानंतर भारतीय चित्रपट चाहत्यांची उत्कंठा अधिक वाढली आहे. कारण अभिनेत्री आलिया भट्ट चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. गॅल गॅडोटच्या हार्ट ऑफ स्टोनमध्ये, आलिया भटने कीया धवनची भूमिका केली आहे.

Heart of Stone Trailer Released
Bigg Boss OTT 2 1st Day : 'बिग बॉस ओटीटी २' सगळेच वरचढ ; काहींची नवी सुरुवात तर काहींचा पहिल्याच दिवशी रामराम

अभिनेत्री आलिया भट आतापर्यंत बॉलिवूडमध्ये नायिकेच्या भूमिका साकारत होती. पण तिने हॉलिवूडमध्ये खलनायिका म्हणून एन्ट्री केली आहे. आलिया भट तिच्या पहिल्याच हॉलिवूड चित्रपटात अॅक्शनसोबतच विलेनगिरी करताना दिसणार आहे.

हार्ट ऑफ स्टोनच्या ट्रेलरमध्ये आलिया भट बंदूक घेऊन धमकावताना दिसत आहे. दुसरीकडे, हार्ट ऑफ स्टोनची जान गॅल गॅडोट या चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. जिच्यासाठी तिचे ध्येय सर्वकाही आहे, जिथे ती कौटुंबिक मित्र आणि नात्यावर विश्वास ठेवत नाही.

ट्रेलरची सुरुवात गॅल गॅडोट एजंटच्या भूमिकेत होते. यानंतर काही अॅक्शन सीन्स दाखवले जातात. ट्रेलरमध्ये आलिया भट्टचे फक्त चार-पाच सीन दाखवण्यात आले आहेत. तिचा लूक आणि बोलण्याची शैली अप्रतिम आहे. (Latest Entertainment News)

चित्रपटाचे पार्श्वसंगीतही हृदय पिळवटून टाकणारे आहे. हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रवाहित होईल. विशेष म्हणजे 'हार्ट ऑफ स्टोन' हा आलियाचा पहिला इंग्रजी चित्रपट आहे.

वर्क फ्रंटवर, या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया भटकडे धर्मा प्रोडक्शनची रॉकी और रानी की प्रेम कहानी आहे. या चित्रपटात अभिनेत्री 'गली बॉय' स्टार रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. तसेच ब्रह्मास्त्र आणि रामायण या चित्रपटामध्ये देखील आलिया दिसणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com