Producer Asit Modi Said Shailesh Lodha Won On False Claims Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asit Kumar Modi News: ‘शैलेश लोढा जिंकलाच नाही’, अभिनेत्याच्या विजयावर निर्माते स्पष्टच बोलले; कोर्टात नेमकं काय घडलं?

Chetan Bodke

Producer Asit Modi Said Shailesh Lodha Won On False Claims

गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची नेहमीच चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका बरीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेमध्ये ‘तारक मेहता...’ फेम शैलेश लोढाने मालिकेच्या निर्मात्यांवर थकबाकी न दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा गेल्या आठवड्यात निकाल लागला असून न्यायालयाने मालिकेच्या निर्मात्यांना एक कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. यानंतर शैलेशने आपल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असून आता असित मोदींनी संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

असित कुमार मोदी एका मुलाखतीत म्हणतात, “शैलेश लोढा यांनी केस जिंकण्यासाठी खोटे दावे केले आहेत. न्यायालयात जरी आपण खटला जिंकलो, असं ते म्हणत असले तरी ते चुकीचे निवेदन करत आहेत. न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे, आम्ही दोघांनी परस्पर बोलून त्यावर तोडगा काढला आहे. त्यांनी कोणतीही केस जिंकलेली नाही. शैलेश लोढा जे काही बोलला, त्याने जे काही आरोप केले, का केले, आम्ही सगळेच त्याबद्दल विचार करतोय. नेमकं असं काय झालं, त्याला वेगळ्या थरावर जाऊन आरोप करावे लागले. जर त्यांनी आता खोटी माहिती पसरवणे जर थांबवले तर आम्ही त्यांचे कौतुक करू.”

असित मोदी आपल्या मुलाखतीत पुढे म्हणतात, “ज्यावेळी मालिकेतील कोणताही कलाकार मालिका सोडण्याचा निर्णय घेतो, त्यावेळी त्याला काही मुख्य कागदपत्रांवर सही करावी लागते. ज्यामुळे जेव्हा तो शो सोडून जातोय हे सिद्ध होतं. ही एक स्टँडर्ड प्रक्रिया आहे, जे मालिकेतील सर्वच कलाकारांना ती गोष्ट फॉलो करावी लागते. मात्र शैलेशने ती प्रोसेस करण्यासाठी विरोध केला होता. आम्ही कधीही त्याचे पेमेंट थांबवलेले नाही. एक्सपिरियंस लेटरवरील अटींबद्दल ज्या काही समस्या असल्यास, आम्ही मिटिंगसाठी शैलेशसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रयत्न करूनही, बाहेर पडण्याच्या कागदपत्रांच्या अटींना अंतिम रूप देण्याऐवजी, शैलेश यांनी एनसीएलटीकडे त्यांचे पैसे मागितले.”

तर मुलाखतीच्या शेवटच्या भागात असित मोदी म्हणतात, “शैलेश आमच्यासोबत गेल्या १४ वर्षांपासून काम करत होते. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कौटुंबिक नाते होते. कामाव्यतिरिक्त आम्ही सुरूवातीच्या दिवसांमध्ये एकमेकांना खूपच सपोर्ट केला होता. बिझनेसबद्दल बोलायचे तर, शैलेशला सुरूवातीला आम्ही वेळेवर पैसे दिले आहेत. तो जेवढ्यापर्यंत आमच्यासोबत होता, तितका काळ आम्ही कधीच तक्रारी केल्या नाहीत. शो सोडल्यानंतर त्याचे वागणे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. त्याचे पेमेंट थांबवण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. पण बाकीच्या कॉर्पोरेटप्रमाणेच जाण्याची औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे, पण त्या अटी शैलेशने पूर्ण केल्या नाहीत.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT