Subhedar Trailer
Subhedar TrailerSaam tv

Subhedar Trailer: स्वराज्यासाठी लढणाऱ्या योद्ध्यांचा इतिहास पडद्यावर झळकणार; 'सुभेदार'च्या ट्रेलरला मिळतेय लाखोंची पसंती 

Subhedar Trailer: तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच या ट्रेलरने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे.
Published on

Subhedar Trailer News: 'आधीलगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं' म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. हाच सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच या ट्रेलरने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे. अतिशय वेगवान पद्धतीने ट्रेलरला लाखोंची पसंती मिळाली आहे. (Latest marathi News)  

'अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तान्हाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी...या शब्दांतून आणि ट्रेलरमधून सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठा, त्याग, समर्पण याचे मूर्तीमंत उदाहरण ही ओळख पटते. काही तासांत या ट्रेलरने कमाल केली आहे. या ट्रेलरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट्रेलरला मिळाली आहे.

Subhedar Trailer
Abhijeet Sawant New Song : इंडियन आयडल फेम गायक अभिजीत सावंतची जादू पुन्हा चालणार; 'लफ्जों में' च्या रिमेक मन जिंकले

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेचस्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर,  समीरधर्माधिकार,  अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे,नूपुर दैठणकर,  भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर आदी मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा ‘सुभेदार’  चित्रपट १८ ऑगस्टला आपल्या भेटीला येत आहे. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.

Subhedar Trailer
Rujuta Deshmukh Video: मुंबई-पुणे महामार्ग आणि ऋजुता देशमुखचं घनिष्ट नातं... व्हिडीओ शेअर करत सांगितली सर्व हकिकत

प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com