अभिनेत्री ऋजुता देशमुखने काही दिवसांपुर्वी एक व्हिडीओ शेअर करून तिचा मुंबई-पुणे प्रवासातील अनुभव सांगितला होता. मुंबईहून पुण्याला जाताना ऋजुता लोणावळ्याला थांबल्यामुळे तिच्याकडून २४० रूपयांचा टोल घेतला होता. यावर ऋजुताने संताप व्यक्त करत व्हिडीओ शेअर केला होता.
ऋजुता ३१ जुलैला पुण्याला गेली होती. ती नेहमीच मुंबई - पुणे असा प्रवास करतो. मुंबईवरून पुण्याला जाताना खालपूर आणि तळेगाव असे दोन टोल नाके लागतात. ऋजुता आणि तिचे कुटुंबिय नेहमी लोणावळ्याला थांबून नाश्ता करतात आणि पुढचा प्रवास करतात.
खालापूर टोलनाक्यावर तिच्याकडून २४० रूपये टोल घेण्यात आला होता. त्यानंतर तळेगावला तिचा ८० रूपये घेतला. त्यानंतर पुन्हा २४० रूपये टोल कट झाला. फास्टट्रक असल्याने तिला मेसेज आणि मेल उशीरा आले.
तिने संबंधितांना मेल करून याविषयी कळवले. त्याचा त्यावर रिप्लाय देखील आला. पण त्यांना याविषयी योग्य ती माहिती नव्हती. पुण्याहून मुंबईला येताना तळेगाव टोल नाक्यालरील मॅनेजरला ऋजुताने हा सर्व प्रकार सांगितला आणि याविषयी विचारले.
तेव्हा तळेगाव टोल नाक्यावरील मॅनेजरने ऋजुताला, टोलचे नियम बदलल्याचे सांगितले. तुम्ही पुण्याला जाताना लोणावळ्याला थांबला होतात का? जर असं केलं तर तुमच्याकडून २४० रुपये टोल घेण्यात आला.असे त्यांनी सांगितले. हे नियम केव्हा बदलले? तसेच दरवेळी वेगवगेळे नियम का? आणि याविषयी माहिती का देत नाहीत? अशी विचारणा ऋजुताने केली.
हा प्रसंग घडल्यानंतर ऋजुताला पुन्हा एकदा या महामार्गावर एक वाईट अनुभव आला. नाटकाच्या प्रयोगादरम्यान पुन्हा अभिनेत्री तिच्या सहकलाकारांसोबत मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करत होती.
ऋजुताने तिचा हा अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ऋजुताने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, 'माझं आणि महामार्गाचा घनिष्ट नातं होत चाललंय, आज आमच्या नाटकाची बस पंक्चर झाली.' या व्हिडीओमध्ये ऋजुताने त्यांची पंक्चर झालेली बस दाखवली आहे.
ऋजुता देशमुखसह अनेकांना नेहमीच मुंबई-पुणे महामार्गावर असे अनुभव आले आहेत. ऋजुताने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.