Priyanka Chopra  Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा बॉलिवूड नव्हे तर साऊथच्या चित्रपटातून करणार कमबॅक !

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा बऱ्याच दिवसांपासून हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेली नाही. आता प्रियांका चोप्रा लवकरच चित्रपटांमध्ये कमबॅक करणार आहे. ही अभिनेत्री ज्येष्ठ दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासोबत काम करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priyanka Chopra : देसी गर्ल प्रियांका चोप्रा शेवटची २०१९ मध्ये फरहान अख्तरसोबत ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेली. फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' या चित्रपटातून प्रियांकाचा कमबॅक करणार असल्याचे बोलले जात होते, परंतु या चित्रपटाबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. आलेल्या नवीन माहितीनुसार प्रियांका एसएस राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करू शकते.

माहितीनुसार, दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी प्रियांका चोप्राला त्यांच्या आगामी चित्रपटासाठी कास्ट केले आहे. या चित्रपटात ती महेश बाबूसोबत दिसणार आहे. अद्याप शीर्षक नसलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे.

६ महिने चर्चा सुरू होती

एका सूत्राने सांगितले की, 'चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षीपासून त्याचे शूटिंग सुरू होणार आहे. एसएस राजामौली अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जी केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. या भूमिकेसाठी प्रियंकापेक्षा कोणी चांगले असू शकतो नाही असे त्यांचे मत आहे सूत्रानुसार, दिग्दर्शक प्रियांकाला गेल्या ६ महिन्यांत अनेकदा भेटले आणि दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.

प्रियांका चोप्रा एसएस राजामौली सारख्या अनुभवी दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. महेश बाबूसोबत काम करणे ही अभिनेत्रीसाठी एक नवीन अनुभव असेल. या चित्रपटात प्रियांका चोप्रा महेश बाबूसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे. हा एक अतिशय चांगले लिहिलेले पात्र आहे आणि प्रियांकानेही या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT