Top 10 Worse Marathi Movies In 2024 : मराठीतील 'या' चित्रपटांनी २०२४ मध्ये केला प्रेक्षकांचा भ्रम निरास

Top 10 Worse Marathi Movies In 2024 : २०२४ मध्ये मराठीत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही चित्रपटांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले पण काही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. जाणून घेऊयात यावर्षी कोणते चित्रपट प्रेक्षकांना आवडले नाहीत.
Flop marathi movie
Flop marathi movieSaam Tv
Published On

Top 10 Worse Marathi Movies In 2024 : २०२४ या वर्षी तब्बल १०० हुन अधिक मराठी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्यातील 'नाच गं घुमा' सारख्या चित्रपटांचे भरभरून कौतुक झाले करण्यात आले पण काही असे चित्रपट देखील होते जे प्रेक्षकांना मुळीच आवडले नाही. या चित्रपटांकडून प्रेक्षकांनी अनेक अपेक्षा होत्या पण त्यांचा भ्रम निरास झाला असून येत्या २०२५ मध्ये येणाऱ्या चित्रपटांकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. जाणून घेऊनयात यातील कोणते चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांचा भ्रम निरास केला आहे.

यावर्षीच्या सगळ्यात वाईट चित्रपटांच्या यादीत सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे गौतमी पाटीलचा 'मूषक आख्यान' चित्रपट. हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरेची मुख्य भूमिका होती. पण मकरंद अनासपुरे यांच्या कारकिर्दीतील हा अत्यंत वाईट चित्रपट असल्याचं बोलण्यात येत आहे.

Flop marathi movie
Rajesh Khanna : सुपरस्टार राजेश खन्ना यांचे स्टारडम संपले या दोन कलाकारांमुळे ; वाचा सविस्तर

त्यानंतर अभिनेता शरद केळकर याचा 'रानटी' हा ऍक्शन मुव्ही प्रेक्षकांना पसंतीस उतरला नाही. या चित्रपटासाठी दशकातील सगळ्यात मोठा ऍक्शन चित्रपट अशी जाहिरात करण्यात आली होती. हा चित्रपट कथानकात मार खाऊन गेल्याचे समीक्षक म्हणाले.

मृणाल उलकर्णी, अश्विनी भावे', श्रुती मराठे मुख्य भूमिके यांच्या मुख्य भूमिका असलेला गुलाबी हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. चांगला मुद्दा, चांगले कलाकार असूनही कथानकात मार खाल्याने हा चित्रपट फ्लॉप ठरल्याचे बोलले जाते हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता.

Flop marathi movie
Katrina Kaif : समुद्र किनारा, जंगलसफारी आणि मित्रपरिवार; कतरिना कैफने शेअर केले पती विकी कौशलसोबत रोमँटिक फोटो

त्यानंतर २००४ साली आलेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांना आवडला नाही. सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी यांच्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. 'नवरा माझा नवसाचा' च्या आठवणी मनात घेऊन चित्रपट पहायला गेलेल्या प्रेक्षकांना या चित्रपटाने निराश केले.

या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे स्वप्नील जोशी याचा 'बाई गं'. सहा पत्नीचा एक नवरा दाखवण्याच्या नादात हा चित्रपट चांगलाच गंडला. हा चित्रपट थिएटर मध्ये पाहणाऱ्यांनी या चित्रपटाला वाईटच म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com