priyanka chopra instagram story x
मनोरंजन बातम्या

Bollywood Actress : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घेतली पाकिस्तानी फिल्ममेकरची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Actress : प्रियंका चोप्रा ही सध्या तिच्या 'हेड ऑफ स्टेट' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Yash Shirke

Priyanka Chopra : देसी गर्ल अशी अभिनेत्री प्रियंका चोप्राची ओळख आहे. बॉलिवूडमध्ये गाजवल्यानंतर प्रियंका आता हॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिचा 'हेड ऑफ स्टेट' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रियंकाच्या कुटुंबाने आगामी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. या स्क्रीनिंग दरम्यानचे फोटो प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केले.

priyanka chopra movie

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर चित्रपटाच्या स्क्रीनिगंदरम्यानचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोंची सोशल मीडियावर सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. यात पाकिस्तानी फिल्ममेकर शर्मिन ओबैद चिनॉय प्रियंकासोबत दिसत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर देखील फोटोमध्ये पोज देत असल्याचे दिसते. पाकिस्तानी फिल्ममेकरसोबतचे फोटो शेअर केल्याने प्रियंका चोप्रा सध्या चर्चेत आहे.

priyanka chopra insta story

दिलजीत दोसांझनंतर प्रियंका चोप्रा चर्चेत

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोरांझ त्याच्या सरदार जी ३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट आणि दिलजीत दोघेही वादाच्या भोवण्यात अडकले आहेत. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने काम केले आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने भारतीय चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्रीला घेतल्याने दिलजीत दोसांझवर टीका होत आहे.

दिलजीत दोसांझ यांच्यानंतर आता प्रियंका चोप्रा वादात अडकल्याचे म्हटले जात आहे. प्रियंका चोप्राचा 'हेड ऑफ स्टेट' हा चित्रपट २ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग प्रियंकाच्या कुटुंबीयांनी आयोजित केले होते. यादरम्यान पाकिस्तानी कॅनेडियन फिल्ममेकर शर्मिन ओबैद चिनॉयला भेटल्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT