Priyanka Chopra with her mother and daughter Saam Tv
मनोरंजन बातम्या

प्रियांकाने दाखवली मुलीची पहिली झलक; आईच्या वाढदिवसाला केला खास फोटो शेअर

प्रियांका चोप्राने तिची आई मधु चोप्रासोबतचा एक अतिशय गोड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिची गोंडस मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची पहिली झलक दाखवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या कामाने लोकांना थक्क करणारी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जानेवारीमध्ये आई (mother) झाली. सोशल मीडियावर तिने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आणि सांगितले की त्यांच्या घरी एक सुंदर मुलगी पाहुणी म्हणून आली आहे. प्रियांका आई झाल्यापासून, चाहते तिच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. 'देसी गर्ल' सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, मात्र तिने अद्याप आपल्या मुलीचा चेहरा दाखवलेला नव्हता. नुकताच प्रियांकाने तिची आई मधु चोप्रासोबतचा एक अतिशय गोड फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिची गोंडस मुलगी मालतीची पहिली झलक दाखवली आहे. (Entertainment News Marathi)

प्रियांका चोप्राने तिची आई मधु चोप्रा यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये चिमुकली मालती तिच्या आजीच्या मांडीवर दिसत आहे. या खास फोटोसोबत प्रियांका चोप्राने आईसाठी एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे.

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रियांकाने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझ्या या पॉझिटिव्ह हास्यासोबत तू सदैव अशीच हसत राहा. तू मला जगण्यासाठी तुझ्यातील उत्साहाने आणि प्रत्येक दिवसाच्या अनुभवाने खूप प्रेरणा देतेस! तुझी युरोपची ट्रीप हे एक उत्तम सेलिब्रेशन होते'. मालतीच्या वतीने 'लव्ह यू टु द मून आणि बॅक आजी.'

एका फ्रेममध्ये दिसल्या तीन पिढ्या...

'देसी गर्ल'ने शेअर केलेला फोटो खूपच खास आहे, कारण या फोटोमध्ये एका फ्रेममध्ये तीन पिढ्या दिसत आहेत. फोटोमध्ये मधु चोप्रा कॅमेराकडे बघत हसत आहे, तर प्रियांका मालतीकडे पाहत आहे.

निक जोनासने सांगितले की, प्रियांका कशी आई आहे...

ग्लोबल आयकॉन बनलेली प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे. अलीकडेच निक जोनसने खुलासा केला आणि प्रियांका कशी आई आहे हे सांगितले. त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की 'ती एक खंबीर आई आणि उत्तम सोबती आहे'. प्रियांकाचे कौतुक करताना निक पुढे म्हणाला की, 'काहीही झाले तरी ती नेहमी खंबीरपणे सोबत उभी असते आणि नेहमी मला पाठींबा देत असते. जेव्हापासून आमची मुलगी घरी आली आहे, तेव्हापासून आम्ही दोघेही खूप जास्त तिची काळजी घेत निक जोनासने सांगितले की, प्रियांका कशा प्रकारची आई आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की ती एक मजबूत आई आणि परफेक्ट पार्टनर आहे. प्रियांकाचे कौतुक करताना निक म्हणाला होता की काहीही झाले तरी ती 'रॉक' सारखी एकत्र उभी असते आणि नेहमी खेळते. या संवादात त्यांनी खुलासा केला होता की, जेव्हापासून मुलगी घरी आली आहे, तेव्हापासून आम्ही दोघही तिची खूप काळजी घेत असतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT