काश्मिरी पंडितांवर वादग्रस्त वक्तव्य करून सई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात; गुन्हा दाखल

तिने व्यक्त केलेल्या या व्यक्तव्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Sai Pallavi
Sai PallaviSaam Tv

Actress Sai Pallavi: दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) साई पल्लवी (Sai Pallavi) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सध्या साई त्याच्या आगामी 'विराट पर्वम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान साई पल्लवीने ‘द काश्मीर फाइल्स’ (Kashmir Files) या चित्रपटाचा संदर्भ देत म्हणाली की, चित्रपटात त्यावेळी काश्मिरी पंडितांची हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले.

या दोन घटनांमध्ये काय फरक आहे? ज्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. तिने व्यक्त केलेल्या या व्यक्तव्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी साईचं मत योग्य असल्याचे म्हटले आहे तर काहींनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. साई पल्लवीने 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे त्यानंतर ती वादात सापडली.

काय म्हणाली साई पल्लवी?

मुलाखतीत बोलताना साई पल्लवी म्हणली की, ‘मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंग बद्दल खूप ऐकले आहे, पण कोण बरोबर आणि कोण चूक, हे मी सांगू शकत नाही. काश्मिरी पंडितांची हत्या कशी होते, हे 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण, त्याचवेळी काळापूर्वी गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याला जय श्री रामचा नारा लावण्यास सांगितले गेले, ही सुद्धा धर्माच्या नावावर होणारी हिंसा आहे. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?

Sai Pallavi
अकोल्यात तक्रारदारच निघाले गुन्हेगार; स्वतःलाच लुटल्याचा केला बनाव

'विराट पर्वम' या चित्रपटात साई पल्लवीने एका नक्षलवाद्याच्या प्रेमात पडलेल्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना साईने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या चित्रपटात साईसोबत राणा दग्गुबती, प्रियामणी आणि नंदिता दास देखील दिसणार आहेत. ही प्रेम आणि राजकारणाची संमिश्र कथा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com