ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
झोपताना केसांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे केस तुटणे थांबवता येते आणि गुंता होणे टाळता येते.
मोकळे केस झोपल्यानंतर गुंततात आणि केस तुटण्याची शक्यता अधिक वाढते.
झोपण्यापूर्वी केस बांधल्याने ते गुंतत नाही आणि केस मजबूत सुध्दा राहतात.
झोपताना उशा खाली सिल्क उशीचे कव्हर वापरावे त्यामुळे केस मुलायम राहतात आणि गुंता होत नाही.
सैल वेणी किंवा सैल पोनी बांधून झोपणे केसांसाठी नेहमी चांगले असते.
केसांना तेल लावून झोपल्याने केसांना चांगले पोषण मिळते आणि केस मुलायम होतात.
खूप घट्ट हेअरस्टाईल करणे टाळा, कारण त्यामुळे केसांच्या मुळांवर दाब येऊ शकतो. फक्त मऊ हेअर बँड वापरा.
केसांची नियमित काळजी घेतल्याने केस निरोगी आणि मजबूत बनतात.