ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वस्तात मस्त घरगुती गोष्टीनं मधे तुम्ही स्वतःच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. तुम्ही घरच्याघरी उपलब्ध असलेल्या घरगुती गोष्टींपासून टोनर बनवू शकता. जाणून घ्या कसे
गुलाब पाणी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. हे त्वचेला थंडावा देतं आणि सर्व स्किन टाइपसाठी योग्य मानले जाते.
रात्री तांदूळ स्वच्छ धुवून तांदळाचे पाणी रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि चेहऱ्यावर टोनर म्हणून वापरा. राईस वॉटर चेहऱ्यावर कापसाने १५ मिनिटे लावून ठेवा. त्वचा उजळ दिसते आणि पोअर्स टाईट होतात.
एक फ्रेश काकडी घ्या. काकडीचा रस काढून तो थंड करून वापरा. सनटॅन कमी करतो आणि त्वचेला फ्रेश लूक देतो.
एॅलोवेरा जेल आणि थोडं पाणी मिसळून टोनर तयार करा. हे ड्राय आणि सेनसेटिव्ह त्वचेसाठी उत्तम आहे.
ग्रीन टी बनवा. बनवल्यानंतर तो थंड करत ठेवा. थंड झाल्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. हा टोनर पिंपल्स कमी करतो आणि ऑइल कंट्रोलमध्ये मदत ठेवतो.
टोनर नेहमी स्वच्छ चेहऱ्यावर लावावे. तयार केलेल टोनर रोज १ ते २ वेळा वापरा आणि फ्रिजमध्ये ठेवा ते जास्त फ्रेश राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.