ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सणासुदीच्या दिवशी केस मऊ, चमकदा आणि सेट दिसावेत यासाठी महिला अनेक उपाय करीत असतात. आता कसाला विचार न करता हे घरच्या घरी झटपट बनणारे हेअर मास्क बनवा आणि केसांवर लावा केसांना इंस्टंट ग्लो देतील.
नारळ तेल केसांना पोषण देते तर मध नैसर्गिक शाईन देतो. १ चमचा नारळ तेल आणि १ चमचा मध मिक्स केसांना लावा.
केस ड्राय आणि फ्रिझी असतील तर हा मास्क तुमच्या केसांसाठी बेस्ट आहे. अर्धी पिकलेली केळी मॅश करून २ चमचे त्यात दही मिक्स करा आणि केसांना लावा.
कोरफडमुळे केसं सॉफ्ट होतात आणि स्कॅल्प शांत ठेवण्याचे काम करते. २ चमचे कोरफड जेल आणि १ चमचा नारळ तेल मिक्स करुन केसांवर लावा.
हा मास्क केसांना नैसर्गिक चमक देतो. तसेच २ चमचे दूध आणि १ चमचा गुलाब पाणी मिक्स करून केसांवर लावा.
कोणताही मास्क केसांवर १५ ते २० मिनिटे ठेवावा. नंतर शॅम्पूने स्वच्छ केस धुवून घ्यावे.
मास्क संक्रांतीच्या एक दिवस आधी लावा म्हणजे केस सेट होतील. तसेच केसांना जास्त तेलकट मास्क लावू नये. केस अर्धवट सुकले असताना केसांवर सिरम लावावे. नंतर तुम्हाला हवी तशी केसांची स्टाईल करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.