Priyanka Chopra SAAM TV
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

Priyanka Chopra First Look Of Globetrotter : एस.एस. राजामौली यांच्या 'ग्लोबट्रोटर' चित्रपटात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा झळकणार आहे. चित्रपटातील प्रियंका चोप्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Shreya Maskar

एस.एस. राजामौली यांच्या 'ग्लोबट्रोटर' चित्रपटात प्रियंका चोप्रा झळकणार आहे.

चित्रपटातील प्रियंका चोप्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

पहिल्यांदाच प्रियंका चोप्रा आणि महेश बाबू एकत्र दिसणार आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली (SS Rajamouli) यांच्या चित्रपटांचे चाहते दिवाने आहेत. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. सध्या ते आपला आगामी चित्रपट 'ग्लोबट्रोटर' (Globetrotter) मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा झळकणार आहे. SSMB29 पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. नुकताच चित्रपटातील प्रियंका चोप्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

'ग्लोबट्रोटर' चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्विट करून प्रियंका चोप्राचा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यांनी प्रियंकाचा एक ॲक्शन मोडमध्ये फोटो टाकला आहे. आणि त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीला नवी ओळख देणारी महिला...देसी गर्लचे (प्रियंका चोप्रा) पुन्हा स्वागत आहे! मंदाकिनीच्या असंख्य छटा जगानं पाहाव्यात, यासाठी मी उत्सुक आहे." अशा शब्दांत एस.एस.राजामौली यांनी प्रियंकाचे कौतुक केले आहे.

प्रियंका चोप्राने देखील आपल्या 'ग्लोबट्रोटर' चित्रपटातील फर्स्ट लूकचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टरला तिने खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "ती दिसते त्यापेक्षा जास्त आहे... हॅलो मंदाकिनीला..." प्रियंका चोप्राच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या लूकचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच चाहते चित्रपटासाठी आता खूपच उत्सुक पाहायला मिळत आहे. नेटकरी तिला नवीन सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत.

'ग्लोबट्रोटर' चित्रपटात प्रियंका चोप्रा 'मंदाकिनी' (Mandakini) ची भूमिका साकारणार आहे. पोस्टमध्ये प्रियंका चोप्राचा डॅशिंग अवतार दिसत आहे. पिवळी साडी, हातात बंदूक आणि पायात कोल्हापूरी चप्पल घालून प्रियंका ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. SSMB29 चित्रपटात ॲक्शन आणि ॲडव्हेंचरचा धमाका असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: मलाइकाचा फोटो वापरून पिंपरीत अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई

Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Live News Update : तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले

Kajol: लग्नाचीही एक्सपायरी डेट असली पाहिजे...; काजोलच्या वक्तव्यावर नेटकरी चिडले; म्हणाले, त्याला घटस्फोट...

Indurikar Maharaj Name History: इंदुरीकर महाराजांना 'इंदुरीकर' हे नाव कसं पडलं?

SCROLL FOR NEXT