'३ इडियट्स' चित्रपटातून 'मिलिमीटर'च्या भूमिकेत अभिनेता राहुल कुमार झळकला.
नुकताच राहुल कुमार आपल्या बायकोसोबत दिल्लीत स्पॉट झाला.
राहुलने एका तुर्कीश मुलीसोबत लग्न केले आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा '३ इडियट्स' (3 Idiots) चित्रपटात आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आजही चित्रपटातील प्रत्येक पात्र लोकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील 'मिलिमीटर ' हे पात्र खूप गाजले. 'मिलिमीटर ' ची भूमिका अभिनेता राहुल कुमारने केली होती. '३ इडियट्स' चित्रपट 2009 साली रिलीज झाला होता. आता 16 वर्षांनी पुन्हा 'मिलिमीटर ' स्पॉट झाला आहे. त्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
'३ इडियट्स' मधील मिलिमीटरने रँचो आणि त्याच्या मित्रांना कॉलेज कॅम्पसमध्ये मदत केली. त्याच्या भूमिकेमुळे तो इतका लोकप्रिय झाला की आजही सर्वजण त्याला 'मिलिमीटर ' म्हणतात. राहुल कुमारला नुकतेच नवी दिल्लीतील एका पोर्ट्रेट फोटोग्राफरने पाहिले. त्यांच्यामधील संभाषणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'मिलिमीटर' लग्नबंधनात अडकला आहे.
राहुल कुमारने एका तुर्की मुलीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच लव्ह मॅरेज आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोर्ट्रेट फोटोग्राफरने प्रथम स्वतःची ओळख करून दिली आणि नंतर राहुलला विचारले की तुमचे फोटो काढू शकते का? त्यावर राहुलने होकार दिला. राहुल म्हणतो की, "मी राहुल आहे." ही माझी पत्नी केझीबान डोगन(Kezyban dogan)आहे. ती तुर्कीची आहे." लग्नाविषयी राहुलची पत्नी म्हणाली, आम्ही 4 मे रोजी लग्न केले. '३ इडियट्स' पाहिल्यानंतर मी राहुलला पहिल्यांदा मेसेज केला त्याला भेटली. त्याने चित्रपटात 'मिलिमीटर'ची भूमिका साकारली. मला वाटतं ते १४ वर्षांपूर्वीचे आहे."
राहुल कुमार अभिनय आणि मॉडलिंग क्षेत्रीत नाव कमावत आहे. अलीकडेच राहुल 'बंदिश बॅन्डिट्स' या वेब सिरीजमध्ये दिसला. '३ इडियट्स' नंतर राहुल कुमारने अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले. तो 'यम हैं हम', आणि 'फिर भी ना माने - बदतमीज दिल' सारख्या टीव्ही शोमध्येही दिसला. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना 'मिलिमीटर 'ला पाहून आनंद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.