Sangola Heavy Rain : सांगोल्यात पावसाने दाणादाण; एकाच दिवशी १७० मिलिमीटर पावसाची नोंद, पिकांचे मोठे नुकसान

Pandharpur Sangola News : कधी नव्हे तो सांगोला तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असल्याने घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर शेतातील पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे
Sangola Heavy Rain
Sangola Heavy RainSaam tv
Published On

पंढरपूर : मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशात दुष्काळी सांगोला तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. एकाच दिवशी तब्बल १७० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने काहींचे संसार उघड्यावर आले आहेत. 

सांगोला तालुक्यातील कडलास अकोला, लोणविरे, सोनंद या भागात काल रात्री चार ते साडेचार तास ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याचा दावा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदास इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. तर सकल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. 

Sangola Heavy Rain
Nanded : व्हिडीओ करत दिला इशारा, नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी; पुराच्या पाण्यात उडी घेत गावकऱ्यांनी वाचविला जीव

६० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान 

मुसळधार पावसामुळे जवळपास ५० ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील मका, बाजरी, तूर, डाळिंब आदी विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात मका, बाजरी, तूर, डाळिंब, द्राक्ष या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. हातात तोंडाशी आलेली पिके या पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी गेल्याने संसारपयोगी साहित्य वाहून गेले आहे. 

Sangola Heavy Rain
Lonar Lake : लोणार सरोवराच्या पाणी पातळीत प्रथमच वाढ; सरोवरातील अनेक पुरातन मंदिरे पाण्याखाली

माजी आमदार शहाजी पाटलांचा शेतकऱ्यांशी संवाद 

दरम्यान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सांगोला तालुक्यात झालेल्या पावसाची परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली आहे. शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत करावी; अशी मागणी करण्यात आल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com