Lonar Lake
Lonar LakeSaam tv

Lonar Lake : लोणार सरोवराच्या पाणी पातळीत प्रथमच वाढ; सरोवरातील अनेक पुरातन मंदिरे पाण्याखाली

Buldhana News : भौगोलिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेलं जागतिक दर्जाचे लोणार सरोवर सध्या संकटात असल्याचे दिसत आहे. याकडे पुरातत्व विभाग, वनविभाग व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
Published on

बुलढाणा : जगप्रसिद्ध असलेले लोणार सरोवर हे जागतिक स्तरावरील एकमेव असं बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं सरोवर आहे. या सरोवरातील पाणी अल्क धर्मीय आहे. मात्र यावर्षी सरोवराच्या पाण्याच्या पातळी लक्षणीय वाढली असल्याने सरोवर परिसरातील असलेले अनेक पुरातन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. वाढलेल्या पाणी पातळीमुळे लोणार सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे बेसौल्ट खडकात निर्माण झालेला जगातील एकमेव सरोवर आहे. जगातील फार कमी उल्कापात सरोवरांपैकी हे एक असून सरोवराचा आकार गोलाकार आहे. त्याचा व्यास सुमारे १.८ किलोमीटरचा आहे. तर सरोवराची खोली सुमारे १५० मीटर आहे व सरोवराचा परीघ ६ किलोमीटर आहे. या सरोवराच्या क्षारिय व खारट पाण्यामुळे सरोवरातील जीवसृष्टी व जैवाविवीधता ही इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे. 

Lonar Lake
Jalgaon : दीड वर्षांपूर्वी झाला विवाह; माहेरी आलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पित्याचा सासरच्यांवर गंभीर आरोप

पाणी पातळी वाढल्याने मंदिर पाण्याखाली 

गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच लोणार सरोवरातील पाण्याची पातळी ही रेकॉर्डब्रेक स्तरावर वाढली आहे. पाण्याची पातळी वाढल्याने लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन काळातील हेमाडपंथीय मंदिरे जसे कमळजा माता मंदिर, गणेश मंदिर, राम गया मंदिर हे मंदिरे पाण्याखाली गेली आहे. खरंतर दोन वर्षांपूर्वीच युनेस्कोने लोणार सरावाराला जिओ हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली आहे. तर वाढलेल्या पाण्यामुळे लोणार सरोवरातील अल्कधर्मी पाण्याची PH वाढल्याचे अभ्यासक सांगतात.

Lonar Lake
Nanded : व्हिडीओ करत दिला इशारा, नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी; पुराच्या पाण्यात उडी घेत गावकऱ्यांनी वाचविला जीव

मानवी हस्तक्षेप वाढल्याचा परिणाम 

गेल्या काही वर्षात लोणार सरोवरात मानवी हस्तक्षेप वाढल्याचे तज्ञांच मत आहे. प्रामुख्याने लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरात सोडले जात आहे. सरोवराच्या तळाशी असलेल्या सुबाभूळची झाडे मोठ्या प्रमाणात वनविभागाने काढली.पर्यटकांना जाण्यासाठी लोणार सरोवरा काठी एक रस्ता तयार करण्यात येत आहे त्यामुळे सरोवराच्या काठाची झीज होत आहे व माती मोठ्या प्रमाणात सरोवरात जात आहे. त्यामुळे लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी वाढली असून या पाण्यात इतर पाणी मिसळल्याने लोणार सरोवराच्या पाण्याची गुणधर्म बदलत असल्याचेही चित्र आहे.

आगामी नवरात्र उत्सवात लोणार सरोवराच्या तळाशी असलेल्या कमळजा माता मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात. मात्र आता हे मंदिर पूर्णपणे पाण्याने वेढले गेल्याने यावेळी नवरात्रीत भाविकांना जाता येणार नाही. लोणार सरोवराची वाढती पातळी ही लोणार सरोवराच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com