Priya Bapat x
मनोरंजन बातम्या

तो आला अन् माझ्या स्तनांना स्पर्श केला, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला तिच्यासोबत घडलेला भयंकर अनुभव

Priya Bapat : प्रिया बापटने एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेला छेडछाडीचा प्रसंग सांगितला होता. सोशल मीडियावर प्रिया बापटच्या या मुलाखतीची चर्चा पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

  • प्रिया बापटने एका मुलाखतीत २०१० मध्ये दादरमध्ये घडलेला छेडछाडीचा प्रसंग सांगितला.

  • गल्लीमध्ये समोर आलेल्या व्यक्तीने तिच्या स्तनांना स्पर्श केला आणि नंतर पळून गेला.

  • प्रिया बापटने हे अनुभव घरच्यांना सांगितले आणि या घटनेमुळे तिच्या मनात राग कायम राहिला आहे.

Priya Bapat Interview : प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या प्रिया बापट व्यग्र आहे. प्रिया बापटच्या एका जुन्या मुलाखतीची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. मुलाखतीमध्ये प्रिया बापटने तिच्याबरोबर दादरमध्ये घडलेला भयानक अनुभव शेअर केला होता.

'हॉटरफ्लाय'ला प्रिया बापटने मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान तिने छेडछाडीचा प्रसंगाबाबत सांगितले होते. प्रिया बापट म्हणाली होती, '२०१० मध्ये मुंबईच्या दादरमध्ये हा प्रकार घडला होता. माझ्या घराजवळच्या गल्लीमध्ये ही घटना घडली होती. शूटिंग संपल्यावर घरी येत होते. तेव्हा माझ्या मैत्रिणींशी फोनवर बोलत होते. फोनवर बोलताना माझ्या हातात सामान देखील होते.'

'कानाला फोन लावून हातात सामान घेऊन घरी जात होते. तेव्हा समोरुन एकजण आला. त्याने माझ्या स्तनांना हात लावला आणि तो पळून गेला. काय झालं ते मला कळलंच नाही. जे काही घडलंय ते समजायला मला ३ सेकंद लागले. मी गल्लीत फक्त उभी राहिले. तेव्हा काय झालं, ते मला कळतंच नव्हतं. मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस तिथे नव्हता. तो कधीच पळून गेला होता', असे प्रिया बापटने मुलाखतीत म्हटले होते.

प्रिया म्हणाली, 'घरी गेले तेव्हा माझी आई घरी नव्हती, बाबा होते. घरात गेल्यानंतर मी ढसाढसा रडायला सुरुवात केली. बाबांनी मला विचारलं, काय झालं? गल्लीमध्ये माझ्यासोबत जे काही झालं ते मी त्यांना सांगितलं. त्यांना एक पुरुष म्हणून लाज वाटली. काय करावं हे त्यांनाही समजत नव्हतं. मी ठरवलं, कोणी माझ्या वाट्याला आलं, तर त्याला मी सोडणार नाही. तेव्हाचा राग माझ्या मनात अजूनही आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT