Priya Bapat And Umesh Kamat Instagram
मनोरंजन बातम्या

Priya Bapat-Umesh Kamat : 'मला भीती वाटतेय, मी निराश आहे...'; रंगभूमीवर कमबॅक करताच प्रिया बापटची पोस्ट चर्चेत

Jar Tar chi Goshta Housefull Show : प्रिया उमेशला रंगभूमीवर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Priya Bapat Shares Experience Of Jar Tar Chi Goshta

प्रिया बापट (Priya Bapat)ही आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीसह हिदींमध्येही प्रियाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी हिंदी आणि आता पुन्हा रंगमंच प्रियाचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. प्रिया म्हटल की उमेश आलाच.

प्रिया उमेशने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु ही जोडी जेव्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येते तेव्हा अजूनच धमाल येते. नेहमी हटक्या नवीन भूमिका घेऊन हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता ते दोघं १० वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर एकत्र दिसत आहेत.

'जर तरची गोष्ट' (Jar Tar chi Goshta)या नाटकाच्या निमित्ताने ही जोडी रंगभूमीवर एकत्र आली आहे. प्रिया आणि उमेशच्या करिअरची सुरवातच नाटकांपासून झाली आहे. नाटकावर असलेल्या प्रेमाबद्दल ते नेहमीच सांगत असतात. अनेकदा प्रियाने उमेशच्या नाटक निर्मिती केली आहे. परंतु प्रेक्षक या दोघांना मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी आतुर होते.

प्रिया उमेशला रंगभूमीवर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे. प्रिया उमेशच्या 'जर तरची गोष्ट' नाटकाचा शुभारंभ झाला आहे. ५ ऑगस्टला ठाण्यात पहिला प्रयोग झाला. त्यानंतर पुण्यात दुसरा प्रयोग पार पडला. हे दोन्ही प्रयोग हाऊसफुल होते. नाटकाला मिळालेल्या प्रतिसादाचा व्हिडिओ प्रियाने सोशल मीडियार शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये प्रिया म्हणते की, १० वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करत आहे. मला भीती वाटत आहे. मी थोडी निराशदेखील आहे. या पोस्टमध्ये प्रियाने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. कॅप्शनमध्ये प्रियाने लिहले आहे की, 'पुन्हा एकदा रंगभूमीवर यायचा माझा निर्णय योग्य होता. आपण जसजस माध्यम बदलतो तशीतशी प्रक्रियाही बदलते. रंगमंच म्हणजे स्वतः ला प्रेक्षकांसमोर मांडणे. काम करताना संपूर्ण ऊर्जा आणि मन लावून प्रेक्षकांसमोर स्वतः ला समर्पित करावे.

सिनेमा किंवा ओटीटीवर काम करणे नवीन होते. परंतु हाउसफुल लोकांसमोर सादरीकरण करणे, लोकांच्या प्रेम आणि टाळ्या यासारखे दुसरे काही नाही. मी तुमच्या सर्वांच्य प्रेमाची सदैव आभारी राहीन. माझा हा प्रवास अविस्मरणीय करणाऱ्या सर्व लोकांनाआणि क्रिएटीव टीमला खूप शुभेच्छा.'

प्रियाच्या या पोस्टने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. प्रिया उमेशच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाची उत्तम सुरवात झाली आहे. प्रियाच्या या पोस्टर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी नाटकाचे खूप कौतुक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT