Alyad Palyad Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alyad palyad 2 : पुन्हा एकदा उडणार प्रेक्षकांच्या भितीचा थरकाप; 'अल्याड पल्याड २'ची घोषणा

Apurva Kulkarni

'अल्याड- पल्याड' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. भयाबरोबरच विनोदाची योग्य सांगड घातली गेल्याने प्रेक्षकांनीही चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. याच प्रेक्षकांच्या पसंती मान देत निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर यांनी 'अल्याड पल्याड 2' हा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. निर्मात्यांनी त्याबाबतची घोषणा केली असून जून 2025 मध्ये अल्याड पल्याडचा सिक्वेल प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मकरंद देशपांडे, संदीप पाठक, गौरव मोरे, अनुष्का पिंपुटकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल आहे... कोट्यवधी रुपयाचा गल्ला अवघ्या एका आठवड्यात प्रेक्षकांनी चित्रपटाला मिळवून दिला आहे.. भयाबरोबरच विनोदाची जोड प्रेक्षकांना अधिकच भावली आहे.. त्याच बरोबर संदीप पाठक याच्या अभिनयालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

'अल्याड पल्याड’ चित्रपट हा एका नदीनं वेढलेल्या ओरस नावाच्या गावावर आधारित आहे. ज्यात पूर्वजांच्या कर्माचे भोग, म्हणून गावातील सर्व सजीव दरवर्षी तीन दिवस वेशीबाहेर अर्थात नदीच्या पल्याड जातात.. या तीन दिवसादरम्यान गावात भुताचा वावर असल्याचं बोललं जातं.. याच परंपरेच्या आधारावर हा चित्रपट काढण्यात आला आहे. ज्यात शहरातून तीन मित्र गावी येतात आणि भुताचं अस्तित्व अमान्य करत गावात न जाण्याची ताकीद असतानाही ते गुपचूप गावात शिरतात. गावात जाताना त्यांच्या मागावर एक मुलगी निधी असते... अशी सुरुवात केलेला हा चित्रपट, प्रेक्षकांचं शेवटपर्यंत भरभरून मनोरंजन करतो.

त्यातच आता 'अल्याड पल्याड'च्या सिक्वेलची घोषणा झाल्यानं हॉरर चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरल आहे.. जून 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिक्वेलची उत्सुकता आतापासूनच प्रेक्षकांमध्ये दिसून येतेय.. त्यामुळे भुताचा खेळ जून 2025 ला प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT