The Traitors X
मनोरंजन बातम्या

The Traitors Trailer : मुन्‍ना भैया मर गए और तुम... OTT वर २० सेलिब्रिटी खेळणार अनोखा खेळ, करण जोहरकडे मोठी जबाबदारी

The Traitors या जागतिक स्तरावरील रिअ‍ॅलिटी शो भारतीय अवतारात येणार आहे. या शोमध्ये करण जोहरकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शोमध्ये २० सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

Yash Shirke

भारतातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे आवडते व्यासपीठ असलेल्या प्राइम व्हिडिओने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित अनस्क्रिप्टेड ओरिजिनल शो द ट्रेटर्सच्या प्रीमियरची घोषणा केली. हा शो १२ जून २०२५ पासून फक्त प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे आणि त्यानंतर दर गुरुवारी रात्री ८ वाजता नवीन भाग प्रेक्षकांना पाहता येईल.

भारतीय प्रेक्षकांसाठी या विशेष आवृत्तीत करण जोहर होस्ट म्हणून आपला ग्लॅमर आणि खास शैली घेऊन येणार असून शोमध्ये भारतभरातील विविध क्षेत्रातील २० प्रसिद्ध सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होणार आहेत. विश्वास आणि फसवणुकीच्या या अनोख्या खेळात प्रत्येकजण मोठ्या रोख बक्षिसासाठी आणि प्रतिष्ठेच्या ‘अल्टिमेट विनर’च्या किताबासाठी स्पर्धा करणार आहेत.

प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्राइम व्हिडिओने आधी एक आकर्षक आउटडोअर प्रचार मोहिम राबवली आणि त्यानंतर करण जोहरने एक खास व्हिडिओद्वारे केवळ प्रीमियर दिनांकच जाहीर केला नाही, तर शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटींबाबत काही संकेत देखील दिले. या व्हिडिओत आगामी ड्रामा, थरार आणि अप्रतिम ट्विस्टची झलकही देण्यात आली.

प्राइम व्हिडिओ इंडिया ओरिजिनल्सचे प्रमुख निखिल मधोक म्हणाले, "प्राइम व्हिडिओने आजवर देशातील सर्वात मोठ्या स्क्रिप्टेड शोस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. आता आम्ही अनस्क्रिप्टेड कंटेंटच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलत आहोत आणि ‘द ट्रेटर्स’सारखा आमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो घेऊन येत आहोत. थरार, रणनीती, सस्पेन्स आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला हा शो उच्च दर्जाच्या निर्मितीमूल्यांसह सादर केला आहे. करण जोहर सारखा होस्ट असल्यामुळे या खेळात रंगत आणली जाणार यात शंका नाही!"

All3Media इंटरनॅशनलच्या EVP APAC, सबरीना डुगेट म्हणाल्या, "भारत हा एक अत्यंत रोमांचक आणि गतिमान मार्केट आहे जिथे प्रेक्षक रिअ‍ॅलिटी कंटेंटला प्रचंड प्रतिसाद देतात. ‘द ट्रेटर्स’चे भारतीय रूप सेलिब्रिटींच्या सहभागाने, थरारक ट्विस्ट्सनी आणि थिंकिंग गेमप्लेमुळे प्रेक्षकांसाठी एक अत्युत्तम अनुभव ठरणार आहे. आम्ही प्राइम व्हिडिओ इंडिया आणि बीबीसी स्टुडिओज इंडिया प्रोडक्शन्ससह ही फ्रँचायझी भारतात सादर करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT