PM Narendra Modi On Chhaava Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava Movie 'छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य...'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'छावा'चे कौतुक

PM Narendra Modi On Chhaava Movie: 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'छावा' चित्रपटाचे कौतुक केले आहे.

Shruti Vilas Kadam

Chhaava Movie: 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे, यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज्यांच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण चित्रपटाचे कौतुक करत आहेत. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची जादू पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या काही दिवसांत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि लवकरच तो ३०० कोटींचा टप्पा ओलांडेल. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते आम्ही तुम्हाला सांगतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी छावा बद्दल काय म्हणाले?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींनी 'छावा' चित्रपटाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले, “मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेण्यात महाराष्ट्र आणि मुंबईने मोठे योगदान दिले आहे. सध्या 'छावा' चित्रपट देशभरात धुमाकूळ घालत आहे. संभाजी महाराजांचे शौर्य या स्वरूपात सादर करण्याची प्रेरणा शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीतून मिळाली आहे.

छावाने आठ दिवसांत किती कमाई केली?

पहिला दिवस: ३१ कोटी रुपये

दुसरा दिवस: ३७ कोटी रुपये

तिसरा दिवस : ४८.५ कोटी रुपये

चौथा दिवस : २४ कोटी रुपये

पाचवा दिवस : २५.२५ कोटी रुपये

साहावा दिवस : ३२ कोटी रुपये

सातवा दिवस : २१.५ कोटी रुपये

आठवा दिवस: २३ कोटी रुपये

एकूण कलेक्शन - २४२.२५ कोटी रुपये

गोव्यात छावा करमुक्त

अलीकडेच, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'छावा' हा चित्रपट गोव्यात करमुक्त करण्याची घोषणा केली. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, “छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित 'छावा' हा चित्रपट गोव्यात करमुक्त होणार हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. विकी कौशल अभिनीत हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचे धर्म, आणि देशासाठी असलेले शौर्य, धैर्य आणि त्याग दाखवतो. या चित्रपटात त्यांचा गौरवशाली इतिहास उत्तम रित्या पडद्यावर मांडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : महिनाभर सकाळच्या नाश्त्याला खा 'हा' पदार्थ; झपाट्याने वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

SCROLL FOR NEXT