Prajakta Mali: प्राजक्ताचा लग्नाला होकार; अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, स्वतः केला खुलासा

Prajakta Mali Wedding: अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका मुलाखती दरम्यान तिच्या लग्न विषयीची मोठी घोषणा करून चाहत्यांना थक्क केले आहे.
Prajakta Mali Wedding
Prajakta Mali WeddingSaam Tv
Published On

Prajakat Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सतत चर्चेत असते. लवकरच तिचा आगामी चित्रपट चिकी चिकी बूम बूम प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन सुरु असताना अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लग्न विषयीची मोठी घोषणा करून चाहत्यांना थक्क केले आहे.

प्राजक्ता माळीने ‘सुमन म्युझिक मराठी’ या युट्यूब चॅनेलच्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत प्राजक्ताने सांगितले की ती सध्या लग्नासाठी तयार असून आता तिला लग्न करायचे आहे. प्राजक्ता म्हणाली, “माझ्यासाठी मुले शोधण्याकरीता आता मी आईला परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मी उडत उडत असच कुठेतरी बोलून गेले होते. त्यानंतर आईला खरंच दोन पत्र आली. मला ती पत्र आवडली आहेत.

Prajakta Mali Wedding
Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची गर्जना; पण, अर्जुन कपूरच्या पदरी यावेळी ही निराशाच

कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांने खूप प्रांजळपणे म्हटलेले आहे की, ‘मी शेतकरी आहे. मला माहिती आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलत आहे. तुमचे क्षेत्र वेगळे आहे. पण मी शेतकरी आहे. मी शेतीच करणार आहे. तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचे आहे हे पात्र वाचून मी ठरवलं का नाही मी लग्न करू शकते त्यामुळे मी घरी लग्नासाठी होकार दिला आहे आणि आता मी आईला म्हटलंय आता तू माझ्यासाठी मुलगा शोधूनच आण. मला बघायचंच आहे आता कोण आहे तो मुलगा. मी तयार आहे".

Prajakta Mali Wedding
Kavi Kalash: 'ओ छत्रपती, ओ सहचर संभा'; औरंगजेबासमोर कैद कवी कलशांची 'ती' शेवटची कविता शंभूराजांसाठी, एकदा नक्की वाचा

प्राजक्ता माळीच्या फुलावंती या चित्रपटाला झी चित्र गौरव पुरस्कारात ६ पुरस्कार मिळाले आहेत. लवकरच या पुरस्कार सोहळ्याचा भाग प्रसारित होईल. यासह प्राजक्ताची सध्या चिकी चिकी बूम बूम या चित्रपटसह अनेक नवीन काम सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com