Preity Zinta SAAM TV
मनोरंजन बातम्या

Preity Zinta : 'ऑपरेशन सिंदूर' नंतर प्रीती झिंटाचा शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

Preity Zinta Donation For Army Families : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने 'ऑपरेशन सिंदूर'नंतर शहिदांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तिने लष्करी कुटुंबांसाठी देणगी दिली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) सध्या क्रिकेट मॅचमुळे चांगलीच चर्चेत आहेत. तसेच तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्यासोबत तिने काम केले आहे. मात्र आता प्रीती झिंटा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रीती झिंटाने लष्कराच्या कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर अभिनेत्रीने शहीदांच्या पत्नीसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी 1.10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रीती झिंटाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 'आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन' (AWWA) ला 1.10 कोटी रुपये दान केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या हिश्श्यातून ही रक्कम पंजाब किंग्जच्या सीएसआर फंडात दान केली आहे. जयपूरमधील कार्यक्रमात आर्मी कमांडर साउथ वेस्ट कमांड, सप्त शक्ती अव्वाचे प्रादेशिक अध्यक्ष आणि आर्मीचे कुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रीती झिंटाने या कार्याची घोषणा केली.

जयपूरमधील कार्यक्रमादरम्यान प्रीती झिंटा म्हणाली, "या देणगीचा उद्देश धाडसी महिलांना बळकटी देणे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणात मदत करणे आहे. आपल्या सशस्त्र दलांच्या शूर कुटुंबांना काहीतरी देणे हा सन्मान आणि जबाबदारी दोन्ही आहे. आपल्या सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची कधीही खऱ्या अर्थाने परतफेड करता येणार नाही, परंतु आपण त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे राहू शकतो आणि त्यांच्या पुढील प्रवासात त्यांना पाठिंबा देऊ शकतो."

प्रीती झिंटा पुढे म्हणाली की , "आम्हाला भारताच्या सशस्त्र दलांचा खूप अभिमान आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही राष्ट्र आणि आमच्या शूर सैन्यासोबत एकजूट आहोत."

प्रीती झिंटा आता लवकरच 'लाहौर १९४७' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते तिला चित्रपटात पुन्हा पाहण्यासाठी आतुर आहेत. प्रीती झिंटाचा मोठा चाहता वर्ग आहे. 'लाहोर १९४७' चित्रपटात प्रीती सनी देओलसोबत झळकणार आहे. प्रीती झिंटाचे इन्स्टाग्राम 12.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT