Gauahar Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gauahar Khan : संजू राठोडच्या 'शेकी' गाण्यावर थिरकली प्रेग्नेंट गौहर खान, पाहा जबरदस्त डान्स VIDEO

Gauahar Khan Dance Video : संजू राठोडच्या 'शेकी' गाण्यावर अभिनेत्री गौहर खानने भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र संजू राठोडच्या (Sanju Rathod) 'शेकी' (Shaky ) गाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण 'शेकी' गाण्याच्या हुक स्टेपवर भन्नाट रील्स बनवत आहे. हे गाणं सध्या तुफान व्हायरल होत आहेत. नुकताच या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) ने व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री गौहर खानने 'शेकी' गाण्याची हुक स्टेप म्हणजे 'एक नंबर तुझी कंबर' या कडव्यावर डान्स करतानाचा भन्नाट रील सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या गौहर खान दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. त्यामुळे प्रेग्नेंसीमध्ये तिचा हा डान्स खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गौहर खान फ्लोरल प्रिंट पिंक आणि व्हाइट रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. ती या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. मोकळे केस आणि मिनिमल ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.

गौहर खानने या व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "माझ्या लाडकीवर प्रेम दाखवण्यासाठी हे...एक नंबर" गौहर खानने ही रील ईशा मालवीयसाठी केली आहे. 'शेकी' गाण्यात संजू राठोडसोबत ईशा मालवीय देखील झळकली आहे. गौहर खानच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

संजू राठोडचे 'शेकी' गाणे 22 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. काही दिवसांतच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याआधी संजू राठोडची 'गुलाबी साडी', 'काली बिंदी' ही गाणी खूपच गाजली होती. संजू राठोडचे चाहते आता त्याच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT