बॉलिवूड अभिनेत्री शहनाझ गिल (Shehnaaz Gill ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती कायम शेअर करत राहते. सध्या शहनाझचे फोटो पाहून चाहते भलतेच आश्चर्यचकित झाले आहेत. शहनाझने आपले वजन कमी केल्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत आहे. त्यामुळे शहनाझ गिल सध्या तिच्या कमी वजनामुळे (Shehnaaz Gill Weight Loss Transformation) चांगलीच चर्चेत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शहनाझ गिलने फक्त 6 महिन्यांत 55 किलो वजन कमी केले. त्यामुळे ती एवढी सुंदर दिसत आहे. तिने एवढी वजन इतक्या कमी वेळीत कसे कमी केले याची माहिती तिने एका मिडिया मुलाखतीत प्रेक्षकांना सांगितली आहे. शहनाझ गिलचे सीक्रेट डाएट जाणून घेऊयात. तुम्हाला देखील शहनाझ गिल सारखे वजन कमी करायचे असेल तर ५ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
शहनाझ सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करते. ती सकाळी कोमट पाण्यात हळद, ॲपल सायडर व्हिनेगर आणि चहा टाकून पिते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच शरीर डिटॉक्स होण्याच मदत मिळते.
शहनाज सकाळी न चुकता एक तास योग करते. योगामुळे मन शांत होते. तसेच शरीर लवचिक राहते. ती पूर्ण झोप घेते.
संध्याकाळच्या नाश्त्याला शहनाझ तुपात भाजलेला मखाना खाते. मखानामध्ये कॅलरी कमी असतात. यात फायबर आणि प्रथिने जास्त असतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हाडे मजबूत होतात. पचन सुधारते. नाश्त्यामध्ये मोड आलेले मूग, मेथीचे पराठे, डोसा आणि विविध भाज्या यांचा समावेश करते. यामुळे तिला दिवसभर ऊर्जा मिळते आणि ती उत्साही राहते.
शहनाझ रात्रीच्या जेवण्यात खिचडी, दही आणि दुधी भोपळ्याचा सूप यांचा समावेश करते. तसेच चांगली झोप घेते. यामुळे अपचन आणि ॲसिडीटीचा त्रास होत नाही. तर दुपारच्या जेवणात डाळ, सलाड , स्प्राउट्स आणि गव्हाची पोळी खाते. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते.
तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी शहनाझ गिल चांगली झोप घेते. भरपूर पाणी पिते. नियमित डाएट फॉलो करते. योगा आणि व्यायाम करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.