Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात चेहऱ्यावर ओलसरपणा, चिकटपणा येतो.
पावसाळ्यात तुम्ही चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी पुढील नैसर्गिक फेसपॅक लावू शकता.
बेसन, हळद, दही, मध, लिंबाचा रस, गुलाब पाणी इ.
चेहरा कोमट पाण्याने धुऊन स्वच्छ करा. यामुळे त्वचेतील धूळ व तेल निघते.
एका छोट्या बाउलमध्ये बेसन, हळद, दही, मध आणि लिंबाचा रस एकत्र करा.
जर मिश्रण खूप जाडसर वाटत असेल, तर थोडं गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्याच्या भागावर एकसारखी लावा.
15-20 मिनिटे पॅक सुकू द्या. मग हलक्या हाताने स्क्रब करा.
पॅक अर्धवट सुकल्यावर ओल्या बोटांनी हलक्या हाताने स्क्रब करा. मग थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. शेवटी हलकं मॉइश्चरायझर लावा.