Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात मुलांना बाहेरचे पदार्थ खायला देणं लगेचच बंद करा.
पुढे आम्ही तुम्हाला संपुर्ण भाज्यांनी भरलेली फ्रॅंकी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.
चपात्या, उकडलेले बटाटे, गाजर, मटार, बीन्स उकडलेले, कांदा, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला, मीठ , टोमॅटो सॉस, बटर इ.
पॅनमध्ये थोडं बटर गरम करून आले-लसूण पेस्ट परतवा. मग त्यात बटाटे आणि उकडलेल्या भाज्या घालून परतवा. त्यात गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घालून नीट मिक्स करा.
भाज्या हलक्याशा परतून घ्या. चवीनुसार टोमॅटो सॉसही घालू शकता.
तव्यावर चपात्या थोड्या कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी गरम करा.
गरम चपाटीवर टोमॅटो सॉस किंवा हवे असल्यास ग्रीन चटणी लावा. सॉस लावलेल्या चपाटीवर भाज्यांचं मिश्रण पसरवा.
त्यावर कांद्याचे पातळ स्लाइस घाला आणि थोडा चाट मसाला शिंपडा.
चपाती व्यवस्थित गुंडाळा आणि फ्रँकी रोल तयार करा. रोलला थोडा गरम करून सॉस किंवा दहीसोबत सर्व्ह करा.