Sakshi Sunil Jadhav
भारतीय जेवणाच्या थाळीतला एक महत्वाचा पदार्थ किंवा भाग म्हणजे तांदूळ किंवा भात.
भाताशिवाय जेवण अपुरं वाटतं. पण कोणत्या भातातून किती फायदे मिळतात?
चला जाणून घेऊ अशा एका तांदळाची खासियत त्याचे फायदे ऐकून व्हाल चकीत.
इंद्रायणी हा तांदळाचा जसा प्रकार आहे. तसाच फोर्टीफाइड हा तांदळाचा एक प्रकार आहे.
हा तांदूळ ग्लुटेन फ्री असतो. शिवाय त्यात कार्ब्स आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते. FSSAI ने हा तांदूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे.
यातून पौष्टीक घटक, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात मिळतात.
अॅनिमिया असणाऱ्या किंवा आजारातून उठलेल्यांच्या शरीराची झालेली झीज लवकर भरून काढण्यासाठीही हा भात फायदेशीर ठरतो.