मराठी अभिनेते प्रवीण तरडे लवकरच 'देऊळ बंद २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद २'चे शूटिंग थांबवले असून रिलीज डेटही पुढे ढकलली आहे.
प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे.
मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) कायम आपल्या स्पष्टवक्ता म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक भन्नाट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे.
आता लवकरच ते 'देऊळ बंद 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आहेत.
प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत 'देऊळ बंद 2' चे निर्माते जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी देखील आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करत आहे. त्यांनी व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे 'देऊळ बंद 2' चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र त्यांनी आता चित्रपटाचे शूटिंग थांबवले असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपटाचे शूटिंग थांबून सगळे कलाकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरणार आहेत. तसेच 'देऊळ बंद 2'च्या टीमकडून 11 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पुणे पत्रकार संघ आणि शिवार हेल्पलाइनच्या मदतीने पूरग्रस्त भागात गरजू लोकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहचवली जाणार आहे. तसेच या पैशांतून खाण्यापिण्याची व्यवस्था, शिक्षण, विशेष म्हणजे मुलांचे शिक्षणाला हातभार लावला जाणार आहे. प्रवीण तरडे यांच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओला प्रवीण तरडे यांनी खास कॅप्शन दिलं आहे.
"देऊळ बंद - २ चित्रपटाचे शूटिंग थांबवून आम्ही सर्व कलाकार शेतकऱ्यांना मदत करणार... टीमकडून ११ लाख रूपये पत्रकार संघाचे ब्रिजमोहन पाटील आणि शिवार हेल्पलाईन मार्फत शेतकरी, गरजू विद्यार्थ्यांना पोहचवणार..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.