Pravin Tarde Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde : आता शिव्या द्यायच्या झाल्या तरी मराठीत द्या; प्रवीण तरडे असे का म्हणाले?

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : केंद्र सरकराने मराठी भाषेला गुरुवारी अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मराठी माणसांकडून गेल्या ६ दशकांपासून आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मागणी करण्यात येत होती. काल ६ दशकानंतर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. केंद्र सरकारच्या निर्णयावर अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता शिव्या द्यायच्या झाल्या तरी मराठीत द्या, अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडे यांनी दिली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'आपली मराठी भाषा ही पूर्वीपासूनच अभिजात होती. मात्र आता अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिलेला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून आता शिव्याही अभिजात आहेत. इथलं कौतुकही अभिजात आहेत'.

'कोल्हापुरी, पुणेरी, खानदेशी, वऱ्हाडी भाषा करत बसू नका. भाषेला आता अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेसाठी संतांनी खूप मोठं काम केलं आहे. संत परंपरा मराठी भाषेला आहे. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य मराठी भाषेत आहे. मग इथल्या शिव्याही अभिजात आहे. अभिनंदन नाही अभिजात आहे. त्यामुळे शिव्या जरी द्यायच्या झाल्या, तर मराठीत द्या. त्या अभिजात आहेत, असे तरडे पुढे म्हणाले.

'आता या दिवसांपासून सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याबरोबर बाकीच्या भाषाही शिकवा, पण आपल्या भाषेवर प्रेम करा. अभिजात भाषेला बाराशे हजार एक वर्ष घेऊनच जात आहोत. आज तिला शासकीय दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो देण्यासाठी झटले अगदी पुण्यापासून केंद्र सरकारपर्यंत त्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद, असेही ते म्हणाले. प्रवीण तरडे यांच्यासहित इतरही मराठी कलाकारांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयाने मराठी भाषिकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

Jalgaon Shocking News : गरबा खेळताना अचानक तब्येत बिघडली; जळगावमध्ये 'दांडिया किंग'चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Detox Drinks: शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर...

Alum Termeric Benefits: हळद-तुरटीचा फेस पॅक वापरा, पिंपल्सच्या समस्या होतील दूर...

SCROLL FOR NEXT