Pravin Tarde-Deool Band 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde-Deool Band 2 : "देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी..."; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद' पाहून साक्षात दिसतील स्वामी|VIDEO

Deool Band 2 Trailer : प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुंदर झलक पाहा.

Shreya Maskar

'देऊळ बंद 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

'देऊळ बंद 2' चित्रपट प्रवीण तरडेंनी दिग्दर्शित केला आहे.

चित्रपटात स्वामींची भूमिका मोहन जोशी यांनी साकारली.

प्रवीण तरडेंचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'देऊळ बंद २' चा अखेर ट्रेलर समोर आला आहे. ज्यात तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन होत असल्याचा अनुभव मिळतो. अंगावर काटा आणणारा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 'देऊळ बंद २'मध्ये शेतकरी स्वामींची परीक्षा घेताना दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाची टॅग लाइन 'देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची' अशी आहे.

'देऊळ बंद २' चित्रपटात एका महिला शेतकऱ्याची कथा दाखवण्यात आली आहे, जी स्वामींचीच परीक्षा घेते. चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून दिला जाणार आहे.

'देऊळ बंद -2' ट्रेलर

'देऊळ बंद २' च्या ट्रेलरमध्ये खूपच सुंदर डायलॉग पाहायला मिळत आहे. 'देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी...', '१० दिवसांत एक जरी आत्महत्या झाली तर माझं देऊळ बंद!', 'मी तुमचं अस्तित्व मान्य करेन पण, तुम्ही आधी परीक्षा द्या...' असे खूप सुंदर डायलॉग पाहायला मिळतात, जे थेट काळजाला भिडतात. तसेच ट्रेलरमध्ये स्वामी शेतकरी महिलेसोबत प्रवास करताना, तिच्याशी बोलताना दिसत आहेत. शेतात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, एसटीने स्वामी आणि शेतकरी महिला प्रवास करतात.

'देऊळ बंद -2' रिलीज डेट

'देऊळ बंद’ चित्रपटाचा पहिला भाग २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. 'देऊळ बंद -2' चित्रपट २१ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसणार आहे. हा प्रवास खूपच खास ठरणार आहे.

'देऊळ बंद -2' स्टारकास्ट

'देऊळ बंद -2' चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्यासोबत अनेक तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चार चाकी वाहन चालकाने, सोसायटीत खेळणाऱ्या चिमुरडीला चिरडलं घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Maharashtra Education : महाराष्ट्रात तब्बल ५२६ अनधिकृत शाळा, मुंबई विभागात सर्वाधिक शाळांची नोंद; तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती?

Pune Fake Air Force Jawan: बीडचा न्हावी झाला 'तोतया' एअर फोर्स जवान! वर्दी शिवायला गेला अन् पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Intermittent Fasting : इंटरमिटेंट फास्टिंगची कमाल! ब्लडप्रेशर, डायबिटीजसोबत हृदयही राहील निरोगी; एकदा फायदे वाचाच

Digestion: उजव्या की डाव्या? अन्नाचं पचन होण्यासाठी रात्री कोणत्या कुशीवर झोपलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT