Pravin Tarde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde : 'देऊळ बंद 2' चित्रपट बनवण्यामागचं मुख्य कारण आलं समोर, अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर प्रवीण तरडेंनी सर्वकाही सांगितले

Pravin Tarde - Deool Band 2 : 'देऊळ बंद 2'ची टीम अंबाबाईच्या दर्शनाला पोहचली. तेव्हा दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी चित्रपट बनवण्यामागचे मुख्य कारण सांगितले.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

'देऊळ बंद २' च्या टीमने अंबाबाईचे दर्शन घेतले.

प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २' बनवण्यामागचे मुख्य कारण सांगितले.

रणजीत माजगावकर- कोल्हापूर, साम टीव्ही प्रतिनिधी

'देऊळ बंद 2' चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेता रमेश परदेशी यांच्यासह अन्य कलाकारांनीही देवीचे आशीर्वाद घेतले. या चित्रपटाला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्याच पार्श्वभूमीवर कलाकारांनी कोल्हापूरच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) चे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, "महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी 'देऊळ बंद 2' हा चित्रपट बनवला आहे. मायबाप प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रचंड गर्दी केली. चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'देऊळ बंद' हा सिनेमा केला आहे मात्र प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही नमस्कार करतोय. शेतकऱ्याच्या घरामध्ये हा सिनेमा पोहोचला पाहिजे, कारण त्यांच्या मनात दुसरा कोणता वाईट विचार यायला नको. शेतकरी हा प्रति परमेश्वर आहे. शेतकऱ्याला देखील असं अर्धवट सोडून आपल्याला जाता येणार नाही..."

प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, "पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबद्दल जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहेत. युद्धाचे संकट मिटेल, पेट्रोल आणि डिझेलचे आकडे पुन्हा एकदा कमी होऊ दे. आई अंबाबाईकडे हेच साकडे घातलं आहे..."

अभिनेते रमेश परदेशी म्हणाले की, "चित्रपट महामंडळाला थडगं म्हणणं हे दुर्दैवी आहे. कलाकारांच्या हक्काची जागा म्हणून चित्रपट महामंडळाकडे पाहिले जाते. जे काही आरोप प्रत्यारोप चालले आहेत ते आता बंद व्हायला पाहिजेत. सर्वसामान्य कलाकाराचे हित बघून योग्य जागेवर योग्य व्यक्ती बसवले पाहिजेत. चित्रपट महामंडळामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असेल तर तो होऊ नये. राजकीय नेत्यांनी मार्गदर्शक म्हणून नक्की कलाकारांच्या हितासाठी निर्णय घ्यावेत. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday: कोणकोणती शहरं आणि जिल्ह्यात आज शाळा- कॉलेजला सुट्टी, जाणून घ्या एका क्लिकवर...

'गर्व से कहो हम हिंदू है...'; उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?

काँग्रेसच्या आमदाराला 20 कोटींची ऑफर? फोडाफोडीचं राजकारण थांबणार कधी?

Maharashtra News Live Update: पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

Monday Horoscope: करिअर, पैसा की प्रेम? आज तुमच्या राशीत काय घडणार, वाचा एका क्लिकमध्ये

SCROLL FOR NEXT