Pravin Tarde - Deool Band 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection : स्वामींच्या नावानं महाराष्ट्र दुमदुमला; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची दुसऱ्या दिवशी बक्कळ कमाई, आकडा वाचून थक्क व्हाल

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 2 : बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत छप्परफाड कमाई केली. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

मराठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली.

'देऊळ बंद २' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केले आहे.

प्रवीण तरडेंचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'देऊळ बंद २' रिलीज झाला आहे. स्वामींचा हा चित्रपट २१ मे (गुरूवारी) पासून थिएटरमध्ये सुरू झाला. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाला दोन दिवसांत भरपूर प्रेम मिळाले आहे. 'देऊळ बंद २'ने दोन दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. 'देऊळ बंद २'ची कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली. या चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाई, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २

'देऊळ बंद २' चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.०५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जवळपास २.५५ कोटींची कमाई केली. 'देऊळ बंद २' सिनेमाचे दुसऱ्या दिवशी १२३६ शो होते. ज्यामुळे चित्रपटाची दोन दिवसांची एकूण कमाई ५ कोटी रुपयांच्या वर झाली आहे.

'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसली आहे. 'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे.

'देऊळ बंद -2' स्टारकास्ट

'देऊळ बंद -2' चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तर महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Intake: गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकतं?

Diabetes Symptoms: त्वचेवर दिसणारे 'हे' दोन डाग मधुमेह होण्याचे देतात संकेत

Maharashtra News Live Update: मनमाड-लासलगाव रस्त्यावर इंधन भरून जात असलेल्या टँकरचा अपघात

१६ वर्षांची कारकीर्द, १९३४६ धावा, ४८ शतके; मैदानातून बाहेर येताच 'रनमशीन' क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा

Shocking: पुण्यातील आयटी इंजिनिअरची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिली कंपनीतील दोन महिलांची नावं, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT