Deool Band 2 Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection : आता परीक्षा देवाची! 'देऊळ बंद 2' पाहायला चित्रपटगृहात गर्दी, प्रवीण तरडेंनी किती कोटींचा गल्ला जमावला?

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 12 : 'देऊळ बंद 2' ने ५० कोटी पार कमाई केली आहे. चित्रपटाने १२ व्या दिवशी किती कमावले, पाहूया.

Shreya Maskar

'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे ला रिलीज

'देऊळ बंद 2' चित्रपटाची ५० कोटी पार कमाई

'देऊळ बंद 2' चित्रपट हाऊसफुल

प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' चित्रपट सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटातील डायलॉग, संवाद, गाणी, अभिनय आणि चित्रपट थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडले. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी साकारलेली स्वामींची भूमिका चाहत्यांना आपलीशी वाटली. 'देऊळ बंद २'मध्ये शेतकरी महिला स्वामींची परीक्षा घेताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाची टॅग लाइन 'देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची' अशी आहे. चित्रपटाचे १२ दिवसांचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १२

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १२ व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या सोमवारी प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने १,९८१ शोजमधून ₹२.६० कोटींचे नेट कमाई केली आहे. यामुळे आतापर्यंतचे भारतातील एकूण ग्रॉस कमाई ५४.८८ कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर एकूण नेट कमाईने ४६.६५ कोटी रुपये कमावले आहे.

  • 'देऊळ बंद २' दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • एकूण - ४६.६५ कोटी रुपये

'देऊळ बंद २' चित्रपटातील 'देशात सगळं ओरिजनल, डुप्लिकेट फक्त शेतकरी...', '१० दिवसांत एक जरी आत्महत्या झाली तर माझं देऊळ बंद!', 'मी तुमचं अस्तित्व मान्य करेन पण, तुम्ही आधी परीक्षा द्या...' ही डायलॉग खूप गाजत आहे. चित्रपटात स्वामी शेतकरी महिलेसोबत प्रवास करताना, तिच्याशी बोलताना , शेतात, दऱ्याखोऱ्यांमध्ये, एसटीने फिरताना दिसत आहेत. चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्यासोबत महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: ३२ सेकंदात ३४ वेळा चाकूने वार, शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या; थरकाप उडवणारा VIDEO समोर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढवली, या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार

KDMC Hospital: अडीच वर्षाच्या मुलाला इंजेक्शन देताना कमरेत अडकली सुई; रुक्मिणीबाई रुग्णालयाचा निष्काळजीपणा

Poladpur Tourism : पोलादपूरजवळील 'ही' ठिकाणं पावसाळ्यात होतात अधिकच सुंदर, एकदा तरी भेट द्याच

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड; समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला ४ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT