Pravin Tarde saam tv
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde : "महाराज आजही रायगडावर..."; प्रविण तरडे यांनी पर्यटकांना हात जोडून केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

Pravin Tarde Video : मराठी अभिनेते प्रविण तरडे यांनी रायगडावरील कचरा पाहून संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी पर्यटकांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रविण तरडे यांनी रायगडला भेट दिली.

रायगडमधील अस्वच्छता पाहून प्रविण तरडे संतापले.

प्रविण तरडे यांनी पर्यटकांना हात जोडून विनंती केली आहे.

मराठी अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarde) कायम समाजात होणाऱ्या घटनांविषयी आपले स्पष्ट मत मांडतात. अशात नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी रायगडची झालेली दुरावस्था तेथील कचरा हे पाहून पर्यटकांना हात जोडून विनंती केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं या व्हिडीओत काय आहे, जाणून घेऊयात.

नुकतीच अभिनेते प्रविण तरडे यांनी रायगडला भेट दिली. तेव्हा रायगडमधील पुरातन वास्तूंच्या दगडी भिंतींमध्ये प्लास्टिक कचरा कोंबुन ठेवलेला दिसला. त्यामुळे प्रविण तरडे यांनी रायगडवर येऊन कचरा करणाऱ्या पर्यटकांना हात जोडून विनंती केली आहे. ते म्हणाले, "ही कचरा टाकण्याची जागा नाही. राजांचा आहे हा किल्ला. रायगड आपला आहे..." या पोस्टला प्रविण तरडे यांनी एक कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मित्रांनो रायगड आपली राजधानी आहे. आपल्यासाठी तीर्थक्षेत्रच आहे. त्याचं पावित्र्य जपा. महाराज आजही रायगडावर आहेत हे लक्षात ठेवा .."

प्रवीण तरडे यांनी डॉ. विश्वास पाटील यांच्याबरोबर रायगडाला भेट दिली. प्रवीण तरडे यांनी व्हिडीओत म्हटल्यानुसार, रायगडच्या भिंतीला, दगडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केला असेल आणि तिथेच एवढी घाण पाहून प्रवीण तरडे नाराज झाले आहेत. भिंतीच्या भेगांमध्ये ठेवलेला कचरा पाहून ते म्हणाले की, "हा कचरा ज्याने कोणी टाकला आहे. त्यांनी परत रायगडावर येऊ नकोस. येथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला आहे, आपलं रक्त सांडलं आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथे आहेत. त्याचं भान ठेवा. "

व्हिडीओच्या शेवटी प्रवीण तरडे यांनी पर्यटकांना रायगड स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. "दगडांच्या भेगांमध्ये कचरा टाकू नका. ही आपली राजधानी आहे. त्यामुळे आपणच काळजी घ्यायला हवी." असे प्रवीण तरडे म्हणाले. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar News : शिवसेनेला मोठा धक्का! काका - पुतणे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

Hair Care : केस पटापट वाढतील, लावा 'या' दोन गोष्टींपासून बनवलेला हेअरपॅक

Suraj Chavan : सूरज चव्हाणचा आलिशान, लग्जरी बंगला पाहिला का?

Ladki Bahin Yojana: मुदत वाढली पण वेबसाइट सुरळीत कधी चालणार? लाडक्या बहि‍णींसमोर OTPचा प्रश्न कायम, काय कराल?

SCROLL FOR NEXT