Eka Kaleche Mani Marathi Comedy Web Series SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Comedy Web Series Eka Kaleche Mani Launch : प्रशांत दामलेंच्या कॉमेडीला समीर-विशाखाची साथ; ‘एका काळेचे मणी’ तुफान कॉमेडी वेबसीरीज OTT वर प्रदर्शित

Prashant Damale OTT Debut : प्रशांत दामले या मालिकेच्या माध्यमातून वेबसीरीज क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

Pooja Dange

Eka Kaleche Mani Marathi Comedy Web Series : जिओ सिनेमावर प्रथम हलकी फुलकी असलेला कौटुंबिक कॉमेडी सीरीज आपल्या भेटीला येणार आहे. २६ जून रोजी एका काळेचे मणी या सीरीजचा प्रिमियर करण्यात येणार आहे. प्रसिध्द मराठी कलाकार प्रशांत दामले हे या सीरीजमध्ये प्रमुख भुमिकेत असणार आहेत. या मालिकेच्या माध्यमातून वेबसीरीज क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

एका काळेचे मणीमध्ये पिढ्यांमधील संघर्षा बरोबरच परंपरागत मध्यमवर्गीय मुल्यांचा अंगिकार करणारे पालक, मुलांची जीवनशैली आणि त्यांचे अपरंपरागत मार्ग चोखाळणे यांच्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे.

अतूल केळकर यांनी दिग्दर्शित करण्यात आलेल्या या सीरीजची निर्मिती महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर यांनी केली आहे. यामध्ये पौर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार महत्त्वपूर्ण भुमिकेत आपल्याला दिसणार आहेत.

जिओ स्टुडिओजवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसीरीज मध्यमवर्गीय मुल्यांचा पुरस्कार करणार्‍या मराठी कुटुंबावर आधारीत कथा असून मुलांबरोबरच्या मतभेदांना अगदी विनोदी पध्दतीने कशा प्रकारे हसतमुखाने सामोरे जातात हे दर्शवण्यात आले आहे. एक कुटूंब प्रमुख म्हणून वडीलांना परिवाराच्या छबीची चिंता आहे, तर आईला मोठ्या मुलाच्या लग्नाची चिंता आहे.

दुसरीकडे त्यांची मुलगी एक प्राणीप्रेमी आहे, पाळीव प्राण्यांसाठी कपड्यांचा ब्रॅन्ड तयार करण्याचे तिचे स्वप्न आहे. मुलगा आयर्लंडमध्ये पीएचडीचे शिक्षण घेतोय आणि पीएचडीनंतर पुन्हा भारतात येण्याचा त्याचा मानस आहे. लग्न जुळवण्याच्या खटपटीत कुटूंबाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यातून विनोद निर्मिती होते.

या वेबसीरीजविषयी सांगताना प्रशांत दामले म्हणाले “ एका इरसाल कुटूंबातील एका साधारण बापाची भुमिका करणे म्हणजे एक पर्वणी असते. मला आनंद होत आहे की मी 'एका काळेचे मणी' या वेबसीरीजच्या माध्यमातून मी ओटीटी वर पदार्पण करत आहे. यामध्ये एक अस्सल कौटुंबिक कथा आहे जी प्रत्येक कुटूंबाबरोबर जोडली जाऊ शकेल. अतिशय चांगल्या कलाकारांबरोबर काम करणे एक आनंददायी अनुभव असून त्यामुळे लोकांच्या जीवनात हास्य पुन्हा निर्माण होऊ शकेल.”

“एका काळेचे मण ही एक कौटुंबिक नाट्यमय वेबसीरीज असून यामध्ये एकत्र राहण्याची मुल्ये दर्शवतात. ही एक हलकाी फुलकी वेबसीरीज आहे. ज्याचा सर्वजण आनंद घेऊ शकतात. कथानक, पात्रे आणि काम हे प्रेक्षकांना आनंद देऊन त्यांचे मनोरंजन करण्यास योग्य आहे.

प्रशांत दामले हे श्री काळेंच्या भुमिकेत असल्याने एक ताजातवाना करणारा अनुभव ठरले आहेत. त्यांची आभा ही त्यांच्या कामातून दिसून येते. एकंदरीत एका काळेचे मणी म्हणजे मनोरंजनाचा एक अनोखा गुच्छ आहे जो कोणीच टाळू नये.” असे निर्माता महेश मांजरेकर यांनी सांगितले.

विनोद आणि कौटुंबिक नाट्याने भरलेल्या एका काळेचे मणीकडून हास्य, भावना आणि संबंधित क्षणांची रोलरकोस्टर राईड मिळणार आहे. प्रेक्षकांना आता नवीन पात्रे, चांगले कथानक आणि परंपरागत मुल्यांचा संगम साधून तरुण पिढीच्या आकांक्षांना सादर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT