
Marathi Movie Aanibaani Will Released Soon : महाराष्ट्रात कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचं फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही ‘आणीबाणी’ लागू होणार आहे. विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग असणार आहे.
या ‘आणीबाणी’चा जनतेला कोणताही त्रास न होता फक्त आणि फक्त मनोरंजनाचा दिलखुलास आनंद अनुभवायला मिळणार आहे. कारण ही मनोरंजनाची ‘आणीबाणी’ असणार आहे. दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’साठी पुढाकार घेतला आहे.
'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर बरंच काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखकाच्या सोबतीने दाखवलं आहे.
आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटातील नायकाच्या अभिमन्यूच्या अफलातून संघर्षाची, एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची, नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बाप लेकाच्या नात्याची कथा आहे.
राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि कोण अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’तून कसे बाहेर पडणार? याची मनोरंजक कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. (Latest Entertainment News)
कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे.
देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे.
डी.आय, किरण कोट्टा आणि मिक्सिंग नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी केले असून संकलन प्रमोद कहार यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.