Pranit More  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pranit More : 'मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टची खिल्ली उडवतात'; महिला डॉक्टरच्या विधानावर नेटकरी संतापले, प्रणित मोरेच्या शोचा नवा VIDEO व्हायरल

Pranit More Stand-up Comedy Controversy : प्रणित मोरेचा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ₹३७० च्या बिर्याणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात महिला डॉक्टर सांगते की, मेडि‍कल रूममध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टची खिल्ली उडवली जाते.

Shreya Maskar

प्रणित मोरेवर नेटकरी भडकले

₹३७० च्या बिर्याणीनंतर महिला डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल

मेडि‍कल रूममध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टची खिल्ली उडवली जाते

'बिग बॉस १९' चा सेकंड रनर-अप प्रणीत मोरे सध्या आपल्या स्टँड-अप कॉमेडी शोमुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ₹३७० च्या बिर्याणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर प्रणीत मोरेच्या शोमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात डॉक्टर सेजल पवारने केलेल्या वक्तव्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत. व्हायरल व्हिडीओत नेमकं काय, जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला डॉक्टर प्रणित मोरेच्या शोमध्ये मेडिकल कॉलेजच्या पोस्ट मॉर्टेम रूम मधील तिचा अनुभव सांगते. ती म्हणते, पोस्टमॉर्टमदरम्यान सर्वात आधी पोट, मग कवटी उघडली जाते आणि शेवटी प्रायव्हेट पार्ट्सची तपासणी करतात. त्यावर प्रणित बोलतो की, "तू नक्की डॉक्टर आहेस की कसाई? तिथे सगळे गंभीर असतात की विनोदही होतात?" यावर उत्तर देत डॉक्टर महिला बोलली की, "डॉक्टर मृतांच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या आकारावरून विनोद करतात..." प्रणित मोरे बोलतो की, "बिचाऱ्या काकांनी देहदान केले आणि तुम्ही त्यांच्या अवयवांचे आकार मोजता...आता लोक केस देहदान करणार?"

महिला डॉक्टरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका युझरने लिहिले, "एक डॉक्टर असून मृतदेहाची खिल्ली उडवणे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे." दुसऱ्या युझरने लिहिलं की, "तुला लाज वाटली पाहिजे असे बोलताना..." तसेच नेटकरी आता प्रणीत मोरेवरही प्रचंड भडकले आहेत. त्याच्या विनोद शैलीची थट्टा उडवली जात आहे.

'३७० रुपयांची बिर्याणी' नेमका वाद काय?

प्रणीत मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांगरा या तरूणाने सांगितले की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला. त्यांनी ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली. ज्याचे बील हिमांशूने भरले. त्यानंतर ती मुलगी घरी जात होती, पण मुलाला बिर्याणीचे ३७० पैसे वसूल करायचे होते.पैसे वसूल करण्याचा अर्थ म्हणजे त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. या व्हिडीओनंतर हिमांशू जांगराला त्याची नोकरीही गमवावी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT