Pranit More saam tv
मनोरंजन बातम्या

Pranit More : "माझी मोठी चूक, पण..."; ३७० रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेने मागितली माफी | VIDEO

Pranit More Apologized On Rs 370 Ki Biryani Controversy : बिग बॉस फेम प्रणित मोरेने '३७० रुपयांच्या बिर्याणी' च्या वादगस्त व्हिडीओनंतर जाहीर माफी मागितली आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रणित मोरे '३७० रुपयांच्या बिर्याणी' प्रकरणावरून ट्रोल

प्रणित मोरेने '३७० रुपयांच्या बिर्याणी' प्रकरणात मागितली माफी

प्रणित मोरेने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

'बिग बॉस १९' चा दुसरा रनरअप आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरे गेले काही दिवसांपासून '३७० रुपयांच्या बिर्याणी' या प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामना करावा लागला आहे. मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, सामान्य जनता, नेते मंडळी सर्वांनीच या प्रकरणाचा निषेध केला आहे. तसेच प्रणीत मोरेवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणी स्वतः प्रणित मोरेने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून त्याने जाहीर माफी मागितली आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

प्रणित मोरे व्हिडीओत नेमकं काय म्हणाला?

"नमस्कार मला ही गोष्ट खूप वेळापासून सांगायची होती, पण माझं इन्स्टाग्राम अकाउंट suspend झालं होते...तुम्ही सर्वांनी माझा एक व्हिडीओ पाहिला असेल, त्यावर मला खूप नकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत...आणि मी ही नाराजी Deserve देखील करतो...कारण मी जेव्हा त्या मुलाशी संवाद साधत होतो, तेव्हा त्याने खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या...सर्व जण हसत होते, मी पण त्यात वाहवत गेलो आणि कॉमेडी करत राहीलो...ही माझी खूप मोठी चूक झाली...मी त्याला तिथेच थांबवायला पाहिजे होते...पण मी हे करू शकलो नाही...यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे..."

प्रणित मोरे पुढे म्हणाला, "सर्व legal गोष्टींना मी cooperate देखील करत आहे...माझी तुमच्या सर्वांकडे एकच विनंती आहे की, प्लीज मला एक संधी द्या...मी एक चांगला माणूस बनून दाखवेन.. ही माझ्यासाठी एक शिकवण आहे...मी स्वतःवर आणि माझ्या कंटेंटवर काम करत आहे...ही गोष्टी भविष्यात माझ्या कामातून नक्कीच तुम्ही पाहाल..."

'३७० रुपयांची बिर्याणी' नेमका वाद काय?

प्रणीत मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांगरा या तरूणाने सांगितले की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला. त्यांनी ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली. ज्याचे बील हिमांशूने भरले. त्यानंतर ती मुलगी घरी जात होती, पण मुलाला बिर्याणीचे ३७० पैसे वसूल करायचे होते. पैसे वसूल करण्याचा अर्थ म्हणजे त्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. या व्हिडीओनंतर हिमांशू जांगराला त्याची नोकरीही गमवावी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Maharashtra News Live Update: वर्ध्यातील बापूराव देशमूख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

SCROLL FOR NEXT