Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : 'फुलवंती'साठी हास्यजत्रेच्या कलाकारांना किती मानधन? प्राजक्ता माळीनं केला खुलासा

Shreya Maskar

'फुलवंती' (Phullwanti) हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. 'फुलवंती' हा चित्रपट सर्वत्र खूप गाजत आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मुख्य भूमिकेत दिसत आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती देखील तिने केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार 'फुलवंती' चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 लाख, दुसरा दिवशी 36 लाख आणि तिसऱ्या दिवशी 75 लाखांची कमाई केली आहे. आजवर 'फुलवंती'ने 1 कोटी 19 लाखांची बंपर कमाई केली आहे.

'फुलवंती' या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकारही पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात प्रसाद ओक, समीर चौघुले,चेतना भट्ट,रोहित माने, वनिता खरात, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप इत्यादी कलाकार पाहायला मिळत आहेत. 'फुलवंती' चित्रपटासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कलाकारांनी किती मानधन घेतलंय याबद्दल आता प्राजक्ताने खुलासा केला आहे.

एका मीडिया मुलाखतीत तिने महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनी किती रुपये मानधन घेतलं हे सांगितलं आहे. तिने मुलाखतीत सांगितले की, "मी शोसोबत काम करते तर माझ्या पहिल्या निर्मित सिनेमात माझे आवडीचे कलाकार असावेत. त्यामुळे मी ठरवून त्यांना या चित्रपटात कास्ट केलं आहे. मी त्यांना प्रेमाने विनंती केली आणि महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या एकाही सदस्याने मानधन न घेता चित्रपटात काम करायला होकार दिला" 'फुलवंती' पेशवेकाळ दाखवण्यात आला आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'फुलवंती' कादंबरीवर 'फुलवंती' हा चित्रपट आधारित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghaziabad Maid News: किळसवाण्या कृत्याची हद्द! मोलकरीण लघवी मिसळायची अन् जेवण बनवायची; अख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल

Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

SCROLL FOR NEXT