Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : लाखमोलाची 'फुलवंती'; सोनं अन् चांदीनं जडवलेली प्राजक्ता माळीची साडी, किंमत ऐकून डोळे फिरतील

Phullwanti Primer : सध्या 'फुलवंती'ची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. 'फुलवंती'च्या प्रीमियरसाठी प्राजक्ता माळीने सुंदर सोनं अन् चांदीने जडवलेली साडी नेसली होती. या साडीची किंमत जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र प्राजक्ता माळीची चर्चा पाहायला मिळत आहे. नुकताच प्राजक्ताचा (Prajakta Mali) 'फुलवंती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. या चित्रपटात प्राजक्ता मुख्य भूमिकेत दिसत आहे. 'फुलवंती'या चित्रपटातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

'फुलवंती' (Phullwanti) चित्रपटाच्या प्रिमियरला प्राजक्ताचा खास अंदाज पाहायला मिळाला. ती एका सुरेख पैठणीमध्ये स्पॉट झाली. एका मिडिया मुलाखतीत प्राजक्ता माळीनं साडीची किंमत सांगितली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. प्राजक्ताने 'फुलवंती'च्या पिमियरसाठी नेसलेली साडी (Saree) तब्बल तीन लाख रुपयांची (Three lakhs) आहे. तिने खास या कार्यक्रमासाठी पैठणीची निवड केली होती. ही पैठणी सोनं आणि चांदीने जडवलेली आहे. ही साडी विणताना त्यात चांदी भरलेली आहे तर साडीला सोन्याचं लेपण केलं आहे.

तिच्या सुरेख पैठणीचा रंग केशरी होता. तिने हिरव्या रंगाचे ब्लॉऊज सोबत ही साडी नेसली होती. गळ्यात हार अन् नाकात नथ प्राजक्ताचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले. तिचे सौंदर्याने ती नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करते.

'फुलवंती'ला खूप यश मिळत आहे. त्यामुळे प्राजक्ताने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत. प्राजक्ता अभिनयासोबतच उत्तम नृत्यांगना, कवयित्री, निवेदक आणि व्यावसायिका आहे. तिला अनेक कलागुणांनी पूर्ण आहे. तिचा 'फुलवंती' चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे. 'फुलवंती' चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. प्रेक्षक आनंदी होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT