Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : 'मी शब्द दिला...'; त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमास विरोध झाल्यानंतर प्राजक्ताचा पहिला व्हिडिओ समोर

Prajakta Mali Video : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाला विरोध करण्यात आला होता. आता यावर प्राजक्ताने प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ता महाशिवरात्रीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नृत्याचा कार्यक्रम करणार होती. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचा मंदिरातील प्राजक्ता माळीच्या नृत्यास विरोध केला होता. त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे विश्वस्त मनोज थेटे यांनी या कार्यक्रमाला परवागनी दिली. आता या प्रकरणात प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया

"नमस्कार

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा...आज महाशिवरात्री निमित्त होणारा त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रम 'शिवार्पणमस्तु' पहिल्यापासून या कार्यक्रमाला खूप प्रसिद्धी द्यायची नाही असे ठरवले होते. कारण मंदिराचे प्रांगण, क्षेत्रफळ आणि तिथे किती माणसे कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात या सर्व गोष्टींचा विचार करता मी देखील या कार्यक्रमालाबद्दल सोशल मीडियावर अजिबात माहिती दिली नव्हती.

काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती आणि काळजी प्रशासनाच्या मनात आहे आणि त्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी बोलून असा निर्णय घेतला की, मी शब्द दिला आहे त्यामुळे कार्यक्रम होईल.

माझे सहकलाकार माझ्याशिवाय हा कार्यक्रम सादर करतील. यामुळे माझ्या आनंदावर विरजन पडणार आहे. मात्र वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये, ही बाब मला जास्त महत्त्वाची आणि मोठी वाटते. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. अर्थातच जिथे भाव असतो तिथे देव असतो त्यामुळे मी कुठे ही बसून शिवाची आराधना केली तर ती शिवापर्यंत पोहचणार आहे. तिथे कोणाचा हिरमोड होऊ नये आणि कोणाच्या मनात शंका निर्माण होऊ नये म्हणून मी हा व्हिडीओ बनवत आहे.

हर हर महादेव!"

महाशिवरात्रीला प्राजक्ता पुण्याच्या नटरंग अकॅडमीतर्फे शिवार्पणमस्तु हा नृत्याचा कार्यक्रम करणार होती. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी मंदिरातील प्राजक्ता माळीच्या नृत्यास विरोध केला. प्राजक्ता माळीचे नृत्य हे मंदिराच्या परंपरेच्या विरोधात असल्याचे तसेच चेंगराचेंगरी होण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करून ललिता शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाकडे तक्रार केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT