Prajakta Mali : विरोधानंतरही त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार

Prajakta Mali In Trimbakeshwar : महाशिवरात्री निमित्ताने प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध झाला होता. विरोधामुळे हा कार्यक्रम होणार नसल्याचे म्हटले जात होते.
Prajakta Mali Mahashivratri Dance Program In Trimbakeshwar
Prajakta Mali Mahashivratri Dance Program In TrimbakeshwarSaam Tv
Published On

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील नृत्य कार्यक्रमाला विरोध करण्यात आला. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द होणार असे म्हटले जात होते. पण देवस्थानाच्या विश्वस्तांनी प्राजक्ताचा कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याची माहिती देखील दिली.

त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ता माळीच्या नृत्यकार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. याप्रकरणीप्रा त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवले. प्राजक्ता माळीचे नृत्य हे मंदिराच्या परंपरेच्या विरोधात आहे. शिवाय या कार्यक्रमामुळे चेंगराचेंगरी होण्याचा धोका वाढू शकतो असे म्हणत ललिता शिंदे यांनी पुरातत्व विभागाकडे तक्रार केली होती.

या प्रकरणामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे विश्वस्त मनोज थेटे यांच्याकडून खुलासा करण्यात आला आहे. प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार असल्याचे विश्वस्तांनी स्पष्ट केले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक हा नृत्याविष्कार सादर करणार आहे. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. त्याप्रमाणे यंदाही होईल असे मनोज थेटे यांनी म्हटले आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाची परवानगी मिळवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Prajakta Mali Mahashivratri Dance Program In Trimbakeshwar
Chhaava Box Office Collection Day 11: 'छावा' आणि 'पुष्पा २' मध्ये काटें की टक्कर; ११ दिवसांत केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

बुधवारी महाशिवरात्रौत्सवाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिरात रात्री ८ वाजता पुण्याच्या नटरंग अकॅडमीतर्फे शिवार्पणमस्तु हा कार्यक्रम होणार आहे. प्राजक्ता माळी या कार्यक्रमात शिवार्पणमस्तु नृत्य सादर करणार आहे. पुरातत्व विभागाने दिलेल्या निर्णयामुळे वादात सापडलेला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Prajakta Mali Mahashivratri Dance Program In Trimbakeshwar
Govinda and Sunita Ahuja Divorce: गोविंदाचा होणार डिव्होर्स; ३७ वर्षांची लग्नगाठ मोडणार, सुनीतानेच सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com