Salaar Vs Dunki Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Advance Booking: अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासच्या 'सालार'नं किंग खानच्या 'डंकी'ला टाकलं मागं, १२ तासांत केली इतकी कमाई

Salaar Vs Dunki Movie: रिलीज होण्यापूर्वी या दोन्ही चित्रपटांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून दमदार कमाई केली आहे. या चित्रपटांची सध्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासच्या सालारने शाहरुख खानच्या डंकीला मागे टाकले आहे.

Priya More

Dunki vs Salaar Advance Booking:

सिनेरसिकांसाठी या वर्षाचा शेवट खूपच खास होणार आहे. कारण बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki Movie) आणि साऊथचा सुपरस्टार प्रभासचा(Prabhas) 'सालार' (Salaar Movie) हे बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डंकी २१ डिसेंबरला तर सालार २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलीज होण्यापूर्वी या दोन्ही चित्रपटांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून दमदार कमाई केली आहे. या चित्रपटांची सध्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. अशामध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासच्या सालारने शाहरुख खानच्या डंकीला मागे टाकले आहे.

प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'सालार पार्ट वन: सीझफायर' रिलीजसाठी तयार आहे. भारतात चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशभरात या चित्रपटाला प्रचंड डिमांड पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाची सर्व भाषांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये सालारने डंकीला मागे टाकत चांगली कमाई केली आहे.

बुक माय शोमध्ये डंकी आणि सालारच्या अॅडव्हान्स बुकींगचे आकडे समोर आले आहेत. या आकड्यानुसार सालार शाहरुख खानच्या डंकीपेक्षा खूप पुढे गेला आहे. आकडेवारीनुसार, बुक माय शोवर २४ तासांत सालारची ३७.७६ हजार तिकिटे विकली गेली आहेत. तर डिंकीची २८.५३ हजार तिकिटे विकली गेली आहेत. हा आकडा फक्त बुक माय शो या एकाच प्लॅटफॉर्मचा आहे. इतर ठिकाणी देखील या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सालारला तेलुगू व्हर्जनसाठी सर्वाधिक बुकिंग मिळाले आहेत. या भाषेतील ४६ हजारांहून अधिक तिकिटे विकून १ कोटी ७ लाख रुपयांची कमाई झाली आहे. मल्याळमसाठी २३ हजारांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली असून ३४ लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तमिळमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली असून २ लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे. कन्नडमध्ये १३५ तिकीटांची विक्री झाली असून २८ हजारांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री करत ३ लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

दरम्यान, शाहरुख खान स्टारर 'डंकी' या चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशलही महत्वाच्या भूमिकेमध्ये आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक राजकुमार हिरानी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. याआधी प्रदर्शित झालेले शाहरुख खानचे पठान आणि जवान हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत. त्यामुळे त्याचा हा चित्रपट देखील सुपरहिट ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रभासबद्दल बोलायचे झाले तर, 'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर तो सालारमधून पुनरागमन करत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित सालारमध्ये श्रुती हासन, जग्गापती बापू आणि टिनू आनंद यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT