Aadipurush New Poster  Instagram/ @actorprabhas
मनोरंजन बातम्या

Aadipurush: सीतेच्या कपड्यांचा वाद, प्रभासच्या 'आदिपुरुष'मुळे सेन्सॉर बोर्डही अडचणीत, नेमकं काय घडलं?

चित्रपट ट्रोल झाल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला होता. आता पुन्हा एकदा चित्रपट निर्माते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Chetan Bodke

Aadipurush: दाक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली फेम प्रभास प्रमुख भूमिकेत असलेला 'आदिपुरूष' चित्रपटामुळे बराच चर्चेत आला होता. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील कलाकारांची भूमिका बरीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. चित्रपट ट्रोल झाल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केला होता. आता पुन्हा एकदा चित्रपट निर्माते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

चित्रपटात प्रभासने भगवान रामांची, सैफ अली खानने रावणाची तर क्रीती सेननने सीतेचे पात्र साकारले आहे. एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर कुलदीप तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर हा आदेश देण्यात आला आहे. दाखल केलेल्या याचिकेत याचिकाकर्त्याने म्हटले की, चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न घेता ‘आदिपुरुष’चे टीझर प्रदर्शित केला होता. असं करणं हे नियमांचं उल्लंघन आहे, असंही त्या याचिकेत म्हटलं आहे.

सोबतच या याचिकेत सीतेच्या कपड्यावरूनही बराच वादंग निर्माण झाला. अभिनेत्री क्रीतीने यामध्ये सीतेची भूमिका साकारली असून यामध्ये तिने साकारलेल्या कपड्यावर ही आक्षेप घेण्यात आला.

प्रेक्षकांची प्रभू राम आणि देवी सीता यांच्यावर नितांत श्रद्धा आहे, मात्र चित्रपटात ते प्रेक्षकांच्या श्रद्धेच्या विरोधात दाखवण्यात आले आहेत. यासोबतच रावणाच्या लूकबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, देवदत्त नागे आणि सनी सिंग तसेच दिग्दर्शक ओम राऊत यांनी याप्रकरणी प्रतिवादी ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, निर्मात्यांनी कोर्टाच्या या आदेशावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

Shivling: शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात? जाणून घ्या, त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

Thane Crime: १५-२० जण एकावरच तुटून पडले, तरूणाची निर्घृण हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही, गरोदर पत्नीचा टाहो

SCROLL FOR NEXT