RRR: एस.एस.राजामौली दिग्दर्शित 'RRR' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'नाटू नाटू' या प्रसिद्ध गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कामगिरी केल्यापासून 'RRR' चित्रपटाच्या टीमचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. चित्रपटातील गाणीच नाही तर डान्स हूक स्टेप्सनेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चला तर जाणून घेऊया या हिट गाण्याचे चित्रीकरण कसे करण्यात आले.
'RRR' मधील 'नाटू नाटू' या गाण्याने केवळ भारतातच नाही तर परदेशातही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या सोशल मीडियावर चाहते गाण्याच्या स्टेप्स कॉपी करत व्हिडिओ शेअर करत आहे. या गाण्याच्या स्टेप्स चाहत्यांमध्ये लोकप्रिय करण्यामागे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांची किमया आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रेम रक्षित यांनी केले आहे. सोबतच गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित केले गेलेले हे पहिलेच भारतीय गाणे आहे. या गाण्याचे संगीतकार एम. एम. किरावनी आहे.

'नाटू नाटू' या गाण्याच्या शूटिंगसाठी तब्बल ६५ दिवस लागल्याचा खुलासा ज्युनियर एनटीआरने मुलाखतीत केला होता. एनटीआर मुलाखतीत सांगतो, 'आम्ही चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलमध्ये हे गाणे शूट केले होते, शूटिंगसाठी तब्बल ६५ दिवस लागले. मी आणि रामचरण शूटिंगदरम्यान एकमेकांना मारायचो आणि नंतर माफी मागायचो. दिग्दर्शक एसएस राजामौली यांची इच्छा होती की आपण एकमेकांचा खरोखर द्वेष करावा, म्हणून 21-22 दिवसांनंतर, आम्ही माफी मागणे देखील बंद केले. गाणे पूर्ण करण्यासाठी आम्ही लक्ष केंद्रित करू लागलो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.