Poonam Pandey Pregnancy Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: आधी मरणाचं नाटक आणि आता म्हणते, 'मी प्रेग्नेंट नाही...'; पूनम पांडेने पुन्हा केली चाहत्यांची मस्करी

Poonam Pandey Pregnancy Post: अभिनेत्री पूनम पांडेने पुन्हा एकदा चाहत्यांनी थक्क केलं आहे. आधी स्वतःच्या मरणाचं नाटक आणि आता प्रेग्नेंट असल्याची खोटी बातमी या अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांची 'एप्रिल फूल' म्हणून मस्करी केली आहे.

Shruti Vilas Kadam

Poonam Pandey: आपल्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वामुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी काल म्हणजेच मंगळवारी तिने पोस्ट केलेल्या प्रेग्नेंसीच्या फोटोंमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली. मात्र, या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत पूनमने स्वतः स्पष्ट केले की, ती गरोदर नसून हा संपूर्ण प्रकार ‘एप्रिल फूल’ मस्करीचा भाग होता.

मंगळवारी पूनमने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती ‘बेबी बंप’ दाखवताना दिसत होती. सोबतच तिने काही इमोजी पोस्ट करून ती प्रेग्नेंट असल्याची हिंट दिली होती. तिचे हे फोटो काही तासांतच व्हायरल झाले आणि चाहत्यांनी अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी तिला शुभेच्छा देत नवीन आयुष्याबद्दल आनंद व्यक्त केला.

मात्र, अवघ्या एका दिवसातच पूनमने एक व्हिडिओ शेअर करत सत्य उघड केले. तिने सांगितले की, ती गरोदर नाही आणि हा सगळा प्रकार फक्त ‘एप्रिल फूल’ निमित्ताने केलेला मजेदार प्रयोग होता. लोकांना थोडं हसवण्यासाठी आणि तणावातून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न केल्याचेही तिने नमूद सांगितले. आयुष्याकडे खूप गंभीरपणे न पाहता हलक्याफुलक्या गोष्टींचा आनंद घ्या असं देखील ती म्हणाली.

दरम्यान, या फोटोबाबत सुरुवातीपासूनच काहींना संशय होता. कारण काही प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या फोटोंवर ‘Made with AI’ असा टॅग दिसत होता. त्यामुळे अनेकांनी हे फोटो खरे नसल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच अलीकडील कोणत्याही इव्हेंटमध्ये पूनम प्रेग्नेंट असल्याचे वाटले नव्हते.

सोशल मीडियावर यूजर्स पुन्हा तिच्याबद्दल मीम्स तयार करुन तिची चेष्टा करत आहेत. कारण यापूर्वीही पूनम अशाच वादांमध्ये अडकली होती. २०२४ मध्ये तिच्या मृत्यूची खोटी बातमी समोर आली होती, जी नंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठीचा केलेली खोटी बातमी असल्याचे तिने स्पष्ट केले होते. त्यामुळे यावेळीही तिच्या ‘एप्रिल फूल’ स्टंटवर सोशल मीडियावर नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

IPL 2026 : संजूचा पॉवर पंच! वानखेडेवर ठोकलं शतक, मुंबईच्या गोलंदाजांची केली धुलाई

सप्तश्रृंगी गडावरील मंदिरात दरोडा, मंदिरातील 22 किलो चांदी गायब

भाजपच्या मोर्च्यात नडणारी महिला सापडली? जाब विचारणारी महिला बिग बॉस फेम पूजा मिश्रा?

SCROLL FOR NEXT